पुणे

टेल्कोच्या स्नेहमेळाव्यात आठवणींना उजाळा

CD

पुणे, ता. १४ ः टेल्कोच्या फूल टाइम ॲप्रेंटिस परिवाराचा मेगा स्नेहसंमेलन सोहळा वानवडी येथे उत्साहात पार पडला. देश, विदेशातून आलेल्या मित्रांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. ५९ वर्षांनंतर जमलेल्या मित्रांमध्ये आठवणींचा सुगंध दरवळत राहिला.

टेल्कोचे आधारस्तंभ सुमंत मुळगावकर यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या टेल्को ॲप्रेंटिस स्कूलच्या इतिहासातील पहिल्या वीस बॅचच्या मित्रांचा हा स्नेहमेळावा होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहन मते यांची उपस्थिती होती, तर माजी न्यायमूर्ती (उच्च न्यायालय, मुंबई) मृदुला भाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. भाटकर यांनी आपल्या मनोगतात जेआरडी टाटा, सुमंत मुळगावकर आणि रतन टाटा यांना अभिवादन केले. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ‘आठवण’ ही समयोचित कविता सादर करून त्यांनी उपस्थितांना त्यांच्या कविमनाचा प्रत्यय दिला.

उद्योजक अशोक भोसले म्हणाले, ‘‘प्रशिक्षणाचा माझा काळ अतिशय आनंदाचा आणि अनुभव देणारा होता. वरिष्ठ मित्रांनी आम्हाला जगाची ओळख करून दिली. आज जे समृद्ध आयुष्य लाभले आहे, त्याचे श्रेय आमच्या गुरुजनांना जाते.’’

मोहन मते यांनी गुरूंच्या योगदानाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. शिक्षकांनी मुलांच्या हातात जे कौशल्य निर्माण केले, उच्च प्रतीचे संस्कार केले आणि मूल्यांची पेरणी केली, याचा त्यांनी गौरव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणसोबतचा संघर्ष भारत अन् चीनला रोखण्यासाठी, इराणच्या अधिकाऱ्याने सगळंच सांगितलं, अमेरिकेला सुनावलं

Safe Investment : अमेरिका–इराण युद्धाने शेअर बाजार हादरला! घाबरू नका… या 6 गुंतवणुकीत तुमचे पैसे राहतील सुरक्षित

Latest Marathi News Live Update : राज्यसभेबाबतचा निर्णय संध्याकाळपर्यंत घेतला जाईल- संजय राऊत

Budget 2026: यंदा राज्य सरकारची कसरत! तूट, कर्जामुळे योजना व विकासाचा समतोल साधण्याचे आव्हान

Nashik Municipal Corporation : नाशिक मनपाचा शेअर बाजारात डंका! २०० कोटींच्या 'ग्रीन बॉण्ड'ला ५४० कोटींचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT