पुणे, ता. १६ ः ‘‘गिर्यारोहण करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. आर्थिक नियोजनापासून सामान किती न्यायचे, असे अनेक बारकावे तपासावे लागतात. आपल्या शाळांपासून याबाबतचे शिक्षण द्यायला हवे. अशा अभ्यासक्रमातून पुढे आलेले विद्यार्थी उत्तम देश घडवतील. त्यामुळे गिरीप्रेमींसारख्या संस्था निर्माण झाल्या पाहिजे, त्या वाढल्या पाहिजे,’’ असे मत मुंबर्इचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आज व्यक्त केले.
गिरीप्रेमी संस्थेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ‘प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड’चे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), ब्रिगेडियर अशोक अॅबे, कर्नल अंशुमन भदोरिया, हेमचंद्र सिंग, विंग कमांडर, देविदत्त पांडा, गिरिप्रेमीच्या संस्थापिका-अध्यक्षा उषःप्रभा पागे, संस्थापक संचालक उमेश झिरपे, संचालक विजय जोशी, ‘गार्डियन कॉर्पोरेशन’चे संचालक मनीष साबडे, खेमराज ठाकूर, जगदीश कदम आदी उपस्थित होते. या वेळी गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउन्टेनिअरिंगच्या (जीजीआयएम) हँडबुकचे पाहुण्यांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले.
पुढे फणसळकर म्हणाले, ‘‘गिर्यारोहनासाठी तंदुरुस्ती, मानसिकदृष्ट्या दक्ष आणि उच्च आध्यात्मिक ऊर्जा असलेले अभ्यासक्रम गिरीप्रेमीने उपलब्ध केले. राजकीय नेते या सर्व बाबी पाळण्यासाठी आम्हाला दक्ष ठेवतात. झिरपे आणि मी बारापर्यंत फक्त परिक्षेचे जीवन जगलो. नंतर मात्र, त्याने जीवनाची परिक्षा उत्तीर्ण केली.’’
गोखले म्हणाले, ‘‘गिरीप्रेमीचे काम दिवसेंदिवस वाढत आहे, याचा आनंद होत आहे. गिर्यारोहण क्षेत्रात आता नवीन संधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे आता संस्थेने परदेशातदेखील आपले काम विस्तारावे. त्यातून संस्था आणि हे क्षेत्र दोन्ही वाढत जार्इल.’’ सूत्रसंचालन डॉ. अमित त्रिभुवन यांनी केले. भूषण हर्षे यांनी आभार मानले.
नवकल्पना अन् साहस एकमेकांसोबत चालणारे
‘‘गिरीप्रेमी संस्थेची स्थापना अतिशय कष्टातून करण्यात आली. गिर्यारोहण करण्यासाठी मोठे साहस लागते, तर साहस उद्योगजतेचा पाया आहे. त्यामुळे नवकल्पना आणि साहस हे एकमेकांसोबत चालणारे आहे. या पुढील काळात संस्थेचे काम अधिक व्यापक होर्इल,’’ असा विश्वास डॉ. चौधरी यांनी व्यक्त केला.
शिवाजीनगर ः गिरीप्रेमीच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेच्या हॅडबुकचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी खेमराज ठाकूर, जगदीश कदम, विजय जोशी, मनीष साबडे, विवेक फणसळकर, उमेश झिरपे, भूषण गोखले, अशोक अॅबे, कर्नल अंशुमन भदोरिया, हेमचंद्र सिंग.
90409
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.