पुणे, ता. १६ : ‘‘व्यथा आणि वेदनेला नामदेव ढसाळांनी परिवर्तनशील प्रसिद्धी दिली. याद्वारे त्यांनी शोषित वर्गाचा आवाज बुलंद केला,’’ असे मत कवी हृदयमानव अशोक यांनी व्यक्त केले.
विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या जयंतीनिमित्त स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेतर्फे ‘विद्रोही कवी संमेलन’ आणि ‘पद्मश्री पॅंथर नामदेव ढसाळ स्मृती’ पुरस्काराचे आयोजन केले होते. त्यावेळी अशोक हे बोलत होते. यावेळी कलादिग्दर्शक संतोष संखद, महासभेचे संस्थापक अध्यक्ष हरेश देखने, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, स्त्री चळवळीच्या अभ्यासक ॲड. अर्चना मोरे, कवयित्री पुष्पा क्षीरसागर, ॲड. रूपाली हरणशिकारे, ॲड. संगीता भालेराव आदी उपस्थित होते.
संखद म्हणाले, ‘‘ढसाळ यांनी दलित पँथर चळवळीचा आवाज बुलंद केला. साहित्याची नवी व्याख्या मांडत साहित्यातले साचलेपण मोडीत काढले. सध्याचे वातावरण पाहता विद्रोही कवी कलाकारांची जबाबदारी वाढली आहे.’’ तर ‘‘आजची स्त्री परिवर्तनशील होत असताना आपण त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. स्त्री हा समाजाचा आरसा आहे,’’ असे मत ॲड. मोरे यांनी व्यक्त केले.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जितेन सोनवणे, बाळासाहेब कदम, संजीवनी राजगुरू, सुभाष गवळी, दिलीप वाघमारे, वृषाली कदम-वीरगुर्जर, ॲड. आनंद कांबळे, रवी भवार, सेवक थोरात, सतीश वाळेकर, ॲड. उमाकांत आदमाने यांना ‘पद्मश्री पॅंथर नामदेव ढसाळ स्मृती पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. कवी संमेलनात नामदेव ढसाळ यांना कवितेतून अभिवादन करण्यात आले. सागर वाघमारे आणि कविता काळे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. प्रवीण कोल्हे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.