पुणे, ता. १६ ः खानापूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या महात्मा गांधी विद्यालयात संस्थेचे संस्थापक बाबूराव घोलप व मामासाहेब मोहोळ यांच्या स्मृतिसप्ताहाचे औचित्य साधून बीईंग फाउंडेशन व पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सौर ऊर्जेवर चालणाऱ्या वॉटर फिल्टरचे उद्घाटन संस्थेचे उपसचिव एल. एम. पवार यांच्या हस्ते झाले.
विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याची सोय झाल्यामुळेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असे एल. एम. पवार म्हणाले. संस्था पातळीवरून उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानदसचिव ॲड. संदीप कदम, परीक्षा विभागाचे प्रमुख किरण देशपांडे व शाखास्तरावून ज्येष्ठ शिक्षक शशिकांत जाधव यांच्यासह रायबा कुंभार, रमेश जावळकर यांनी प्रकल्प मिळवून देण्यात योगदान दिले.
उपक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक पांडुरंग फापाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक भीमराव आदलिंग, नूतन ओतुरकर, सारिका तापकीर, सुजाता भोसले, शीतल सुकाळे, रमेश कोळी, संतोष पंडित यांनी सहकार्य केले. फलकलेखन अपर्णा आढाव यांनी केले.
निवेदन भगवान मदने व आभार प्रा. सोमनाथ जाधव यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.