पुणे

एप्रिलमध्ये निवडणुकांची शक्यता ः बावनकुळे

CD

पुणे, ता. १६ : ‘‘राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मागणी केलेली सर्व कागदपत्रे आणि माहिती राज्य सरकारकडून सादर करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून केव्हाही या प्रकरणाचा निकाल येऊ शकतो. न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, असे आदेश दिले की आमची तयारी असून तातडीने निवडणुका घेऊ,’’ असे महसूलमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी स्पष्ट केले. एप्रिल महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यताही त्यांनी या वेळी बोलून दाखविली.
भाजपच्या संघटन पर्व मेळाव्यानंतर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘राज्यातील निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालय लवकरच निर्णय देईल. तसे झाल्यास तातडीने निवडणूक घेण्याची आमची तयारी आहे. विधानसभेत महायुतीने २३७ जागा जिंकल्या होत्या. आताही सर्व महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांवर महायुतीच विजयी होईल.’’

कोणतीही योजना बंद होणार नाही
हे सरकार योजना बंद करणारे नसून नवनव्या योजना मांडणारे सरकार आहे. आम्ही प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र अर्थशीर्ष तयार करून त्यासाठी पुरेशी तरतूद केली आहे. त्यामुळे कोणतीही योजना बंद होणार नाही,’ असेही बावनकुळे यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. राज्यात भाजप हा दीड कोटी सदस्य व तीन लाख सक्रिय सदस्य असलेला पक्ष बनवायचा आहे. आतापर्यंत एक कोटी १६ लाख सदस्य नोंदणी झाली आहे. उर्वरित लक्ष्य आम्ही २८ फेब्रुवारीअखेर साध्य करू, असेही ते म्हणाले.

मुंडे प्रकरणावर चुप्पी
‘बीड प्रकरणी अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा किंवा नाही, हा मुंडे, अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर मी बोलणार नाही,’ असे सांगून बावनकुळे यांनी या प्रश्‍नावर अधिक बोलण्यास नकार दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT