पुणे, ता. १८ : ‘श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च’तर्फे आयोजित ‘आयडियाथॉन आंतरमहाविद्यालयीन स्टार्टअप आयडिया स्पर्धा’ नुकतीच उत्साहात झाली.
स्पर्धेत शहरातील विविध महाविद्यालयाच्या ४० संघातील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तंत्रज्ञान, शाश्वत विकास, आरोग्य, फिनटेक, सामाजिक उपक्रम आदी नावीन्यपूर्ण व्यावसायिक कल्पना विद्यार्थ्यांनी येथे सादर केल्या. विद्यार्थ्यांच्या नवीन कल्पनांना व उद्योजकतेला वाव मिळावा, हा या स्पर्धेचा उद्देश होता.
स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, डॉ. सुनील जगताप आणि संस्थेच्या प्रभारी संचालिका डॉ. प्राजक्ता वराळे यांनी केले. या वेळी डिजिटल मार्केटिंग आणि एआय कन्सल्टंट विशाल वेलदोडे, इटॉनचे ग्लोबल सप्लाय चेन अँड प्रॉक्युअरमेन्ट प्रोफेशनल प्रियदर्शन करंजकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.