पुणे

स्वच्छतेसाठी पाऊल पडते पुढे!

CD

पुणे, ता. १८ ः महापालिका प्रशासनाकडून शहर स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी राबविलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेद्वारे ओला-सुका कचरा, राडारोडा, पालापाचोळा तब्बल एक हजार १३९ टन कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावली. स्वच्छतेची मोहीम कायम राहावी यासाठी आता दर महिन्याला महापालिकेकडून प्राधान्य दिले जाणार आहे.
शहरातील रेल्वे स्थानक, एसटी आगार, पीएमपीएल बसस्थानक, सरकारी रुग्णालये, सरकारी कार्यालये यासह विविध सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा, राडारोडा व घाण असल्याचे चित्र ठिकठिकाणी होते. हे चित्र बदलण्यासाठी महापालिकेच्या पाच परिमंडळाअंतर्गत येणाऱ्या महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ‘सर्वंकष स्वच्छता मोहीम’ राबविण्याचा आदेश महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले व अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिला होता. त्यानुसार नऊ डिसेंबर ते २७ डिसेंबर या कालावधीत ही मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये महापालिकेच्या सर्व विभागांनी एकत्र येऊन कारवाई केली होती. महापालिकेच्या ११ विभागांसह स्वच्छता दूत, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालयांसह सरकारी व खासगी कार्यालयांमधील १०, ५३० कर्मचारी सहभागी झाले होते.

‘सी’ व ‘डी’ प्रकल्पात प्रक्रिया
जमा केलेल्या कचऱ्यावर महापालिकेच्याच कचरा प्रक्रिया प्रकल्पांमध्ये प्रक्रिया केली. तर मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या राडारोड्यावर महापालिकेच्या ‘सी’ व ‘डी’ या प्रकल्पामध्ये प्रक्रिया करण्यात आली. ओला कचरा, सुका कचरा, पालापाचोळा संकलित करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.

महापालिकेने डिसेंबर महिन्यात शहरात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात कचरा गोळा केला. याच पद्धतीने शहरात कायम स्वच्छता राहण्यासाठी दर महिन्याला एकदा प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे.
- संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा विभाग, महापालिका


१५ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत केलेली स्वच्छता
- ओला कचरा - ९२ टन
- सुका कचरा - १३३ टन
- राडारोडा - ८३७ टन
- पालापाचोळा - ७७ टन

अतिक्रमण विभाग
- अनधिकृत हातगाड्या - ५९
- अनधिकृत स्टॉल्स - ६७
- लोखंडी काऊंटर - १००
- पथारी व्यावसायिक - १०९
- बेवारस जप्त दुचाकी वाहने - ५०
- बेवारस जप्त चारचाकी वाहने - ४७
- कच्चे-पक्के शेड, झोपड्या, अनधिकृत सिलिंडर आदी - १०४७

आकाशचिन्ह विभाग
- जप्त केलेले स्टिकर्स-पोस्टर्स - १३२९
- जप्त फ्लेक्‍स/बॅनर्स - ९४८
- ग्लोस बोर्ड - ६७
- इतर कारवाई - २१४

किटक प्रतिबंधक विभाग
- औषध फवारणी
- साथरोगाबाबत जनजागृती
- माहितीपत्रक व स्टिकर्सचे वाटप
- कंटेनर सर्वेक्षण
- २७ डासोत्पन्नाची ठिकाणे नष्ट

उद्यान विभाग
- ९०० झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी व साफसफाई
- २७ टन पालापाचोळा व फांद्यांचे संकलन

पथ विभाग
- रस्ते दुरुस्ती व खड्ड्यांची डागडुजी - ४१६९ (चौ.मी.)
- पदपथ दुरुस्ती - १४० (चौ.मी.)

ड्रेनेज विभाग
- ३०७ चेंबरची स्वच्छता
- मेनव्होल कव्हर उचलणे
- पावसाळी चेंबर उचलणे
- चेंबरची झाकणे बदलणे
- ब्लॉक दुरुस्ती

विद्युत विभाग
- अनधिकृत खासगी केबलचे जाळे काढले - ३ लाख ९७ हजार २३० मीटर
- पथदिवे दुरुस्ती - २८१

बांधकाम विभाग
- अनधिकृत बांधकाम कारवाई - १ लाख ७० हजार ९६५ (चौ.फूट)
- कच्चे पक्के बांधकाम, शेडस्‌, फ्रंट मार्जीन, पत्रा शेडवर कारवाई
- नोटीस बजावण्याची कारवाई - ३० ठिकाणे

शिक्षण विभाग
- शाळा-महाविद्यालयांकडून जनजागृती रॅली
- सार्वजनिक स्वच्छता, कचरा वर्गीकरण, प्लॅस्टिक बंदीबाबत जागृती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

“त्यांच्यासोबत काम मास्टरक्लाससारखं वाटायचं" अक्षय कुमारने दिला असरानी यांच्या आठवणींना उजाळा ; भूतबंगला सिनेमात केलं अखेरचं काम

शुक्राच्या वृषभ राशीतील संक्रमणामुळे तयार होतोय पंचमहापुरुष राजयोग ! कोणत्या राशींना होणार फायदा घ्या जाणून

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT