पुणे, ता. १८ : विद्यार्थ्यांमधील नावीन्यपूर्ण संकल्पनांना वाव देण्यासाठी ‘इनोव्हेशन फाउंडेशन’च्या वतीने आयोजित ‘इनोव्हेट यु टेकॅथॉन २.०’ या राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉनच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात शनिवारी (ता. २२) होणार आहे. यामध्ये आयआयटी, ट्रिपलआयटी यांच्यासह देशभरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांतील ३२७ संघातील सुमारे एक हजार २०० विद्यार्थी नावीन्यपूर्ण कल्पनांचा शोध लावणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्यांना सुमारे साडेसात लाख रुपयांची बक्षीसे देण्यात येतील. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र - कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते शनिवारी सकाळी ११ वाजता ‘इनोव्हेट यु टेकॅथॉन २.०’ चे उद्घाटन होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालनालयाचे पुणे विभागीय सहसंचालक डॉ. दत्तात्रेय जाधव उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक कल्पेश यादव यांनी मंगळवारी (ता. १८) पत्रकार परिषदेत दिली.
यादव म्हणाले, ‘‘ही स्पर्धा एआयएसएसएमएस आयओआयटी महाविद्यालयाच्या शैक्षणिक संकुलात होत आहे. येत्या २२ आणि २३ फेब्रुवारीला नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सहभागी विद्यार्थी प्रयत्न करतील. यंदाचा ‘इनोव्हेशन पुरस्कार’ सातारा येथील माण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक बालाजी जाधव यांना दिला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.