पुणे

ज्येष्ठांची फसवणूक करणाऱ्यास अटक

CD

पुणे, ता. १८ : एटीएम कार्डची अदलाबदल करून २१ ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यांतून पैसे काढून फसवणूक करणाऱ्या आरोपीला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून १६ गुन्हे उघडकीस आणत आरोपीकडून १६६ एटीएम कार्ड आणि रोकडसह १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राजू प्रल्हाद कुलकर्णी (वय ५४, रा. अलानहली, म्हैसूर, कर्नाटक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ व्यक्तीच्या बॅंक खात्यातून २२ हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार लालबहादूर शास्त्री रस्त्यावरील बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम सेंटरमध्ये दोन फेब्रुवारी रोजी घडला होता. याबाबत विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांनी या गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक मनोज बरुरे, पोलिस अंमलदार मयूर भोसले, आशिष खरात यांनी खबऱ्याच्या मदतीने आणि तांत्रिक विश्‍लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. आरोपीच्या ताब्यातून वेगवेगळ्या बँकेची १६६ एटीएम कार्ड जप्त केली. आरोपीने शहरात आणखी काही नागरिकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. संबंधित नागरिकांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी, असे आवाहन वरिष्ठ निरीक्षक विजयमाला पवार यांनी केले आहे.
वरिष्ठ निरीक्षक विजयमाला पवार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अरुण घोडके, पोलिस उपनिरीक्षक मनोज बरुरे, पोलिस अंमलदार अशोक माने, मयूर भोसले, सचिन कदम, गणेश काठे, आशिष खरात, अर्जुन मोरे, शिवा गायकवाड, संतोष शेरखाने, नितीन बाबर व सागर मोरे यांनी ही कारवाई केली.

अशी करत होता फसवणूक
ज्येष्ठ नागरिक पेन्शनची रक्कम काढण्यासाठी एटीएम सेंटरमध्ये येतात. ज्या ज्येष्ठ नागरिकांना एटीएम मशिनमधून पैसे काढण्यास अडचण येते, त्यांना तो मदतीच्या बहाण्याने एटीएम कार्ड आणि पिन क्रमांक घेत असे. हातचलाखीने स्वतःकडील एटीएम कार्ड मशिनमध्ये टाकून पिन क्रमांक जुळत नाही. त्यासाठी बँकेत चौकशी करा, असे सांगून तो जात असे. त्यानंतर तो त्या एटीएम कार्डद्वारे पैसे काढून फसवणूक करीत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT