पुणे

मांजरी पाळण्‍याचे कारण अस्‍पष्‍ट

CD

पुणे, ता. १८ : हडपसरमध्‍ये एका सोसायटीमधील सदनिकेत ३०० मांजरे पाळण्‍याचा प्रकार उघडकीस आला. मात्र, एकीकडे एक ते दोन मांजरे पाळण्‍यासही अशक्‍य असताना दुसरीकडे मात्र, इतक्‍या प्रमाणात ही मांजरे पाळण्‍याचे कारण काय? असा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे. महापालिकेच्‍या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही मांजरे पाळण्‍याचे कारणे संबंधित मालक असलेल्‍या दोन बहिणींना विचारला असता त्‍यांनी मात्र त्‍यामागचे निश्चित कारण सांगितलेले नाही. म्‍हणून ही ३०० मांजरे पाळण्‍याचे कारण अद्याप अस्‍पष्‍ट आहे. दुसरीकडे त्‍यांना मांजरांचे दुसऱ्या ठिकाणी स्‍थलांतर करण्‍यासाठी तीन दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

ही मांजरे पाळणारी महिला उच्‍चशिक्षित असून, ती परदेशातही नोकरीला होती. ती महिला मांजरांसोबतच सदनिकेत राहते. दोघी बहिणी त्‍या मांजरांची काळजी घेतात. त्‍यांनी त्‍यांच्यासाठी खाण्‍यापिण्‍याची सोय केली आहे व त्‍यांची काळजी घेण्‍यासाठी आठ ते दहा महिलादेखील मदतनीस म्‍हणून घेतल्‍या आहेत. त्‍यामुळे सकृतदर्शनी या मांजरांवर अत्‍याचार होतोय असेही नाही, परंतु इतक्‍या मोठया प्रमाणात मांजरी पाळण्‍याचा ना परवाना घेतला ना त्‍यांचे लसीकरण किंवा त्‍यांची नसबंदीदेखील केलेली नाही.

दरम्‍यान, महापालिकेच्‍या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या दोनही महिलांची चौकशी केली असता त्‍या मांजरी पाळण्‍याचे स्‍पष्‍ट कारण सांगत नाहीत. ते पाळण्‍यामागे त्‍यांचा काही व्‍यावसायिक हेतू आहे की, केवळ प्रेमापोटी पाळल्‍या जात आहेत याचीही माहिती घेतली जात आहे.
.......
अस्‍पष्‍ट नियमांमुळे कारवाईबाबत पेच
प्राण्‍यांवर जर अत्‍याचार होत असेल जसे त्‍यांना उपाशी ठेवणे, मारहाण करणे असा प्रकार होत असल्‍यास त्‍यांच्‍यावर प्राणी क्रूरता अधिनियमानुसार कारवाई करता येते. मात्र, या मांजरांच्या प्रकरणात ही बाबही नसल्‍याने त्‍यांच्‍यावर कारवाईदेखील कशी करायची? हा पेच आता उपस्थित झाला आहे. कारण इतक्‍या मोठया प्रमाणात मांजरी सापडल्‍याचे हे पहिलेच प्रकरण आल्‍याने हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. कोणी किती प्राणी पाळावे त्‍याबाबतही नियमांची स्‍पष्‍टता नाही. फक्‍त बाहेर प्राणी घेउन जाताना त्‍याने दुसऱ्यांना इजा होणार नाही याची काळजी घेण्‍यात यावी इतकेच आहे.
........

याबाबत कार्यवाही करण्‍यासाठी ‘ॲनिमल वेल्फेअर बोर्ड’ कडून मार्गदर्शक सूचना मागवल्या आहेत. मांजरांच्‍या स्‍थलांतरासाठी संबंधितांना तीन दिवसांची मुदत दिली आहे. जर त्‍यांनी दुसरीकडे स्‍थलांतर केले नाही तर ब्‍ल्‍यू क्रॉस, युनिव्हर्सल या स्‍वयंसेवी संस्‍थांची मदत घेउन त्‍यांचे या संस्‍थांच्‍या निवारागृहात ठेवता येईल का याबाबत निर्णय घेण्‍यात येईल.
– डॉ. सारिका फुंडे, पशुवैद्यकीय अधिकारी, पुणे महापालिका
............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT