पुणे, ता. १९ : मूळ खाते सोडून प्रतिनियुक्तीवर पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए) ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांवर अखेर प्राधिकरणाने कारवाई सुरू केली आहे. तीन वर्षांसाठी नगररचना विभागातून प्रतिनियुक्तीवर प्राधिकरणात आलेले एक सहाय्यक नगररचनाकार आणि एक कनिष्ठ आरेखक या दोघांची आयुक्तांनी पुन्हा मूळ विभागात म्हणजे नगररचना विभागात पाठवणी केली आहे.
‘पीएमआरडीए’ची स्थापना झाल्यानंतर प्राधिकरणाने इतर विभागांतील अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती करत पदे भरली. त्यासाठी नगररचना, महसूल, लेखा विभाग आदी विभागांतील अधिकारी-कर्मचारी यांची प्रतिनियुक्ती करत कारभार करण्यास सुरुवात केली. प्राधिकरणातील बांधकाम परवानगी विभाग म्हणजे विकास शाखा यामध्ये येण्यास अनेक अधिकारी-कर्मचारी इच्छुक असतात. अशा प्रकारे प्राधिकरणात नगररचना विभागातून तीन वर्षांसाठी एक अधिकारी विकास परवानगी शाखेत आले, तर एक कनिष्ठ आरेखक हे तीन वर्षांसाठी नगररचना विभागातून प्राधिकरणात प्रतिनियुक्तीवर आले. या अधिकाऱ्यांनी तर तब्बल आठ वर्षे प्राधिकरणात सेवा बजावली. मात्र तरीदेखील या अधिकाऱ्यांना प्राधिकरणाचा मोह काही सोडवत नव्हता.
या दोन अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध नागरिकांनी प्राधिकरणाचे आयुक्त यांच्याकडे तक्रारींचा पाढाच वाचला. या दोन कर्मचाऱ्यांबद्दल आयुक्तांनी माहिती घेतल्यानंतर तीन वर्षे उलटूनही हे दोन्ही अधिकारी येथेच कार्यरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे आयुक्तांनी या दोन कर्मचाऱ्यांची घरवापसी करीत त्यांना मूळ विभागात पाठवणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.