पुणे

जिल्ह्यात अंगणवाडी सेविका, मदतनीसांची भरती

CD

पुणे, ता. १८ : जिल्ह्यात २२८ अंगणवाडी सेविका आणि ५३० मदतनीस अशा ७५८ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून, शनिवारपर्यंत (ता. २२) अर्ज करता येणार आहे. या पदांसाठी किमान बारावी उत्तीर्ण असण्याची शैक्षणिक पात्रता आवश्यक असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे यांनी दिली.

महिला व बालविकास विभागाच्या वतीने पाच हजार ६३९ अंगणवाडी सेविका आणि १३ हजार २४३ मदतनीस पदाची भरती प्रक्रिया राबविली जात आहे. त्यानुसार जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची ७५८ पदे रिक्त आहेत. अर्जाची छाननी करून गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असून या यादीनंतर आक्षेप मागविण्यात येणार आहे. त्यानंतर गुणांकानुसार पदाच्या नियुक्तीचा आदेश पंचायत समिती स्तरावरून देण्यात येणार आहे. १५ मार्चपर्यंत अंगणवाडी सेविकांचे रिक्त पदे भरली जाणार असल्याचेही गिरासे यांनी सांगितले.

ग्रामपंचायतीमध्ये करता येईल अर्ज
अंगणवाडी सेविका, मदतनीस भरतीसाठी शैक्षणिक अर्हतेसह इतरही निकष तपासले जाणार आहेत. यात बारावीची टक्केवारी, पदवीधर, पदव्युत्तर आदी शैक्षणिक गुण पाहिले जाणार आहेत. याच बरोबर विधवा, अनाथ, प्रवर्ग आणि अनुभवानुसार गुणांकन दिले जाणार आहे. योग्य कागदपत्रांसह स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे.

महत्त्वाच्या तारखा...
२२ फेब्रुवारी : अर्ज दाखल करण्याची मुदत
२८ फेब्रुवारी : अर्ज छाननी
१० मार्च : आक्षेप व हरकती नोंदविण्याची मुदत
१५ मार्च : अंतिम यादी प्रसिद्ध करून नियुक्तीपत्र देणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT