पुणे

लाखाच्‍या मदतीसाठी पुणे महापालिकेकडून ‘नियम-अटी’

CD

पुणे, ता. १९ : गुलियन बॅरी सिंड्रोम'' (जीबीएस) झालेल्‍या रुग्‍णांच्‍या नातेवाइकांना एक लाखाची मदत करण्‍याची घोषणा तर पुणे महापालिकेने मोठ्या थाटात केली, परंतु प्रत्‍यक्ष त्‍याची अंमलबजावणी करताना त्‍याला ‘नियम व अटी’ लागू केल्‍या आहेत. ज्‍या रुग्‍णांचा आरोग्‍यविमा असेल त्‍यांना ही मदत मिळणार नसून, विम्‍याच्‍या मर्यादेपेक्षा जास्‍त रक्‍कम भरावी लागली तरीही त्‍यांना तो खर्च खिशातून करावा लागणार आहे.

पुणे शहरात आतापर्यंत १३६, तर संपूर्ण जिल्‍हयात २११ रुग्‍ण आढळून आले आहेत. ‘जीबीएस’ रुग्‍णांच्‍या उपचारांचा येणारा पाच ते दहा लाख रुपयांचा खर्च परवडत नसल्‍याने त्‍यांच्‍या खर्चाचा भार हलका व्‍हावा यासाठी महापालिकेने या रुग्‍णांसाठी प्रत्‍येकी १ लाखाची मदत करण्‍याची घोषणा केली होती. खासगी रुग्‍णालयाने रुग्‍णांना अंतिम बिल देताना त्‍यातून एक लाख रुपये वजा करून ते द्यावेत, असे सांगितले होते. त्‍यावेळी सरसकट सर्वच रुग्‍णांना ही मदत केली जाईल, असे जाहीर केले होते, मात्र आता त्‍यांना प्रत्‍यक्षात बिल देण्‍याची वेळ आल्‍याने मात्र हात आखडता घेत त्‍याला ‘नियम व अटी’ लागू करत मूळ निर्णयापासूनच ‘घुमजाव’ केल्‍याने लाखो रुपये खर्च झालेल्‍या रुग्‍णांच्‍या नातेवाईकांचे तोंडचे पाणी पळाले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना महापालिकेच्‍या आरोग्‍य विभागाच्‍या आरोग्‍यप्रमुख डॉ. नीना बोराडे म्‍हणाल्‍या की, जे ‘जीबीएस’ चे रुग्‍ण शहरी-गरीब योजनेत आहेत त्‍यांना एक लाख रुपयांची मदतीची रक्‍कम वाढवून ती मर्यादा दोन लाखांची केली आहे, तर महापालिकेचे आजी-माजी अधिकारी, कर्मचाऱ्यांना अंशदायी वैद्यकीय योजनेतून १०० टक्‍के बिलाचा परतावा मिळेल, तर महात्‍मा फुले जन आरोग्‍य योजनेतील रुग्‍णांवरही मोफत उपचार होत आहेत.
............
१४ जानेवारीनंतर खासगी रुग्‍णालयात उपचारासाठी दाखल झालेले व महापालिकेच्‍या कार्यक्षेत्रात राहत असलेल्यांना १ लाखाची मदत मिळेल, परंतु ज्‍या रुग्‍णांना आरोग्यविमा आहे त्‍यांना ती लाखाची मदत मिळणार नाही. पुण्‍यात उपचार घेणाऱ्या बाहेरील जिल्ह्यांतील रुग्‍णांना औषधांची मदत करता येते, मात्र त्‍यांनाही नियमानुसार लाखाची मदत देता येणार नाही.
– डॉ. नीना बोराडे, आरोग्‍यप्रमुख, पुणे महापालिका
---------
‘जीबीएस’रुग्‍णांचे महापालिकेकडून विश्लेषण :

रुग्‍णाचा प्रकार – संख्‍या
मांसाहार करणारे - ७१
शाकाहार करणारे - ३६
शाकाहारी आणि अंडी सेवन करणारे - १९
अंडी वगळता शाकाहार आणि मांसाहार करणारे - २
अन्न सेवनाबाबत माहिती न दिलेले - ५
इतर - ३
------------
कोणत्‍या योजनेत किती रुग्‍ण
महात्‍मा फुले जन आरोग्‍य योजना ः ३८
अंशकालीन आरोग्‍य योजना – ३
शहरी गरीब योजना – ८
इतर – ८७
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Airport: दिल्ली विमानतळावर थरारक क्षण! दोन विमानांच्या पंख्याची धडक, काही सेकंदांत वाचले शेकडो जीव

भारतातील नवीन ग्रॅज्युएट्ससाठी AI स्पेशलिस्ट' अन् 'कंटेंट क्रिएटर' ठरतायेत टॉप करिअर ट्रेंड्स! LinkedIn ‘Grads Guide 2026’ अहवाल

Pali News : प्रवाशांचे हाल थांबणार! सर्व अडथळे दूर करत रोहा-पुणे एसटी अखेर बसस्थानकात दाखल

Who is Navnita Gautam? विराट कोहली, स्मृती मानधना यांना 'फिट' ठेवणारी नवनीता गौतम; RCB ने तिच्यासाठी घेतलेला ऐतिहासिक निर्णय

Latest Marathi News Live Update : हरिवंश यांची राज्यसभेचे उपसभापती म्हणून निवड केली जाईल

SCROLL FOR NEXT