पुणे

शासकीय ई-टेंडर प्रक्रिया प्रशिक्षण

CD

विविध शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक विश्वस्त संस्था, देवस्थाने आता ई-टेंडर प्रक्रिया राबवत आहेत. याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण २२ व २३ फेब्रुवारी रोजी आयोजिले आहे. प्रशिक्षणात विविध विभागातील नोंदणी, न दिसणारे टेंडरसुद्धा कसे शोधायचे, बीओक्यू भरताना येणाऱ्या अडचणी, टेंडरला लागणारी कागदपत्रे, कागदपत्रे डिजिटल सही करून कशी सादर करायची, इएमडी व एसडीमध्ये सूट कशी मिळवायची, स्वतःकडे मशिनरी नसतील तर करावयाचे भाडेकरार, निविदापूर्व बैठकीला जाण्यापूर्वी करावयाच्या १५ महत्त्वपूर्ण गोष्टी कोणत्या याबाबत तसेच इतर महत्त्वाच्या तांत्रिक गोष्टींबद्दल सविस्तर मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७

आयात निर्यात व्यवसाय संधी व व्यवस्थापन
आयात-निर्यात व्यापार, व्यवसाय व व्यवस्थापनासंबंधी मार्गदर्शन करणारे दोन दिवसीय प्रशिक्षण २२ व २३ फेब्रुवारी रोजी आयोजिले आहे. नफा मिळवून देणाऱ्या या व्यवसायातील विविध संधींविषयी असणाऱ्या अपुऱ्या माहितीमुळे याचा फायदा अजूनही अनेक व्यापारी व नव्याने व्यवसाय सुरु करू इच्छिणारे नवउद्योजक यांना मिळत नाही. या पार्श्वभूमीवर या प्रशिक्षणाचे आयोजन होत आहे. यामध्ये भारत सरकारचे आयात-निर्यात धोरण (एक्झिम ट्रेड), पेमेंट सेटलमेंट व इनकोटर्म्सची आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरली जाणारी पद्धत, शिपिंग, मालवाहतुकीचे दर, कंटेनर व्यवस्थापन, विदेश व्यापारातील नवीनतम जागतिक ट्रेंड, निर्यात सुरू करण्यापूर्वीची तयारी, आवश्यक कागदपत्रे, वाटाघाटी कशा कराव्या याचे कौशल्य, पॅकेजिंग व लेबलिंगचे मानदंड, शासनाच्या विविध निर्यात योजना, निर्यातदारांसाठी डिजिटल साधने आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

क्लाऊड किचन कार्यशाळा
क्लाऊड किचनमध्ये व्यावसायिक स्वयंपाकघराचा वापर केवळ डिलिव्हरी किंवा टेकआउटसाठी अन्न तयार करण्याच्या उद्देशाने केला जातो. पारंपारिक रेस्टॉरंटपेक्षा अत्यंत कमी खर्चात क्लाऊड किचनद्वारे नफा कमावता येतो. मेस, कॅन्टीन किंवा अशा इतर सेवांचा स्वतःचा व्यवसाय क्लाऊड किचनच्या मदतीने कमीत कमी गुंतवणुकीत कसा सुरू करावा याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा २३ फेब्रुवारी रोजी आयोजिली आहे. यामध्ये स्वतःचा क्लाऊड किचन ब्रँड कसा सुरू करयाचा, घरातूनच मेस अथवा कॅन्टीनचे व्यवस्थापन कसे करायचे, रेस्टॉरंट, कॅफे इत्यादींद्वारे क्लाऊड किचन कसे चालवावे, स्वच्छता आणि सुरक्षा प्रशिक्षण, सरकारी नियम, कायदे, अनुपालन, लायसन, एकापेक्षा अधिक क्लाऊड किचन कसे चालवावेत आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे. ज्यांना हॉटेल अथवा मेस व्यवसाय सुरु करायचा आहे परंतु पुरेशी गुंतवणूक नाही अशांसाठी क्लाऊड किचन हा उत्तम पर्याय आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

सलून, ब्युटी व्यावसायिकांसाठी कार्यशाळा
सलून आणि ब्युटी व्यावसायिक व कर्मचाऱ्यांसाठी हेअर पॅच व हेअर एक्स्टेंशन ऍप्लिकेशन तंत्र ही एक दिवसीय कार्यशाळा २४ फेब्रुवारी रोजी आयोजिली आहे. कार्यशाळेत केसांचे पॅच आणि एक्स्टेंशन्स लावण्याचे विविध प्रकार तज्ज्ञांकडून समजून घेण्यापासून ते नैसर्गिक लुकचे तंत्र, केसांची सजावट, ऍप्लिकेशन वापरण्याच्या सुरक्षित पद्धती आणि आफ्टरकेअर टिप्स प्रात्यक्षिकासह शिकवल्या जाणार आहेत. कार्यशाळेतील सहभागींना प्रमाणपत्र मिळेल, प्रीमीयम हेअर प्रॉडक्टवर विशेष सवलती मिळतील आणि सलूनमध्ये या नवीन शिकलेल्या सेवा प्रदर्शित करण्यासाठीचा रेडी सोशल मीडिया कन्टेन्ट मिळेल. याव्यतिरिक्त, सहभागींना कार्यशाळा पूर्ण झाल्यावरही व्यवसाय वाढवण्यासाठीचे मार्गदर्शन व सहाय्य मिळत राहील.
संपर्क : ८४८४८११५४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

SCROLL FOR NEXT