पुणे

शेगावीचा योगीराणा : संत गजानन महाराज

CD

शेगाव म्हणजे भारतात शेकडोंनी आढळणाऱ्या गावासारखे एक गाव, परंतु शंभरात एक ठरावे असे सुंदर तीर्थक्षेत्र आहे. हे ज्यांच्यामुळे घडले, त्या सिद्ध पुरुषांचे खरे नाव आजही कुणाला माहीत नाही. संत कोणत्याही धर्माचे, पंथाचे असो त्यांच्या कार्याचा प्रभाव भाविकांच्या मनावर पिढ्यानपिढ्या टिकून असतो. हे सिद्धपुरुष सतत ‘गण गण गणात बोते’ या नावाचा जप करत असल्याने लोकांनी त्यांचे नाव ‘गजानन’ असे ठेवले. माघ वद्य सप्तमी (ता. २३) म्हणजे संत गजानन महाराजांचा प्रकट दिन. यानिमित्ताने...
- जसू पंजवानी, पुणे

चमत्कार, अंतीद्विय अनुभव हा भारतीय मानसिकतेचा गाभा असून हा त्या संतांच्या अभिव्यक्तीचे एक अपरिहार्य माध्यम आहे. शेगावात आल्यानंतर भाविकांना महाराजांच्या सामर्थ्याची व संत तत्त्वाची प्रचिती आली. त्यांनी आपल्या भावबळाने आर्त भाविकांना बांधून ठेवले. भाविकांसाठी, दीनदुबळ्यांसाठी ते साक्षात्कारी कल्पतरू, चिंतामणी, करुणेचा सागर व दीन जनांचे माहेर आहेत. ते केवळ संत नसून कलियुगातील साक्षात देवच आहेत.
अवतारी पुरुष अनेक स्वरूपात प्रकट होत असतात आणि अनेक प्रकारांनी लोकांना सन्मार्गाला लावण्याचे कार्य करतात. समाजातील सद्‍भाव, धर्म, पापभिरुता टिकविण्याचे कार्य सातत्त्याने करीत असतात. ते कोणत्याही स्वरूपात दिसले तरी त्यांच्या ठायी ज्ञान, भक्ती आणि योग यांचा समन्वय झालेला दिसतो. ते कल्पतरू असल्यामुळे भाविकांच्या मनोकामना जाणून घेत पूर्ण करतात. तसेच शक्तीने उन्मत्त आणि लक्ष्मीने धुंद झालेल्या उर्मट लोकांवर कठोर होऊन आपल्या अलौकिक सामर्थ्याने त्यांना शिक्षा करून धडाही शिकवतात. त्यांचा चमत्काराच्या संस्कारात विलक्षण सामर्थ्य असल्याने त्यांच्याकडे वास्तवदृष्टीने न पाहता त्यातून सत्य तेवढेच घ्यायचे असते. हे नवनीत श्रीगजानन महाराजांच्या चरित्रातून निश्चित प्राप्त होते.
श्रीगजानन महाराजांच्या चरित्रातील अनेक प्रसंग भाविकांना मार्गदर्शक ठरतात. ‘वेडवेमाजी दडे महात्मभेणे’ असे त्यांचे वागणे असे. या वेडसरपणाच्या आवरणामागे एक ज्ञानसंपन्न योगी पुरुष लपलेला असायचा. कित्येकदा ते काय बोलत ते कळत नसे; कारण इतके भरभर बोलत असतं. वेदमंत्र मात्र स्पष्टपणे धडाधड म्हणत. त्यांच्या अंगाच्या विभूतीमत्त्वामुळे अनेक भाविक त्यांच्याकडे आकर्षित होत. अनेकांना त्यांच्या सामर्थ्याचा अनुभव आला. अज्ञानामुळे किंवा अनगुणांमुळे जे लोक शोककारक प्रसंगात अडकले, त्यांची दुःखे महाराजांनी आपल्या सहज लीलेने दूर केलीत.
श्रीगजानन महाराजांच्या चरित्रात भाविकांना लौकिकातून वर काढण्याचे, आध्यात्मिक सुख, समाधान, शांती देण्याचे विलक्षण सामर्थ्य आहे. म्हणून भाविक आपल्या ध्यान मौनातून ‘श्रीगजानन महाराज की जय’ असे नामस्मरण करत असतात. यामुळे अनुरक्तीचा सुगंध त्यांच्या जीवनात दरवळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kolhapur Danoli killing case : दानोळी २५ लाखांच्या अपहरण करून खून प्रकरणाला नवे वळण; एकावर डोळा, दुसऱ्यावर गेम, गुप्तांगाला दिला विजेचा शॉक

Pune Airport: पुणे विमानतळ धावपट्टीचे काम पावसाळ्यानंतरच; उन्हाळी हंगामामुळे दुरुस्ती लांबणीवर, ‘नोटम’ कालावधीत काम होणार!

जातीचा दाखला कैसा बनाया? सहर शेख अडचणीत, ४ कार्यालयांना फसवलं; नगरसेवकपद धोक्यात

Nirav Modi Extradition Update : नीरव मोदीला भारतात आणलं जाणार? CBIची टीम लंडनमध्ये

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं टेन्शन आणखी वाढणार... रोहित शर्मा MI vs PBKS मॅच खेळणार की नाही? जाणून घ्या काय आहे अपडेट

SCROLL FOR NEXT