पुणे

‘जीबीएस’च्या ७२ टक्‍के रुग्‍णांवर यशस्वी उपचार

CD

पुणे, ता. १९ ः पुण्‍यात आतापर्यंत आढळलेल्‍या २११ ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ (जीबीएस)च्‍या रुग्‍णांपैकी १४४ रुग्‍णांवर (७२ टक्‍के) यशस्‍वी उपचार झाले असून, सध्‍या ५६ (२८ टक्‍के) रुग्‍णांवर उपचार सुरू आहेत, तर ११ रुग्‍णांचा (५ टक्‍के) मृत्‍यू झाला आहे. बुधवारी एकाही नवीन रुग्‍णाची नोंद झालेली नाही.

नवीन ‘जीबीएस’ रुग्‍णांची संख्‍या आता कमी होत असून, ही बाब दिलासादायक आहे. त्‍याचबरोबर रुग्‍णांचे बरे होण्‍याचे प्रमाणदेखील चांगले वाढले आहे. सध्‍या शहर व पिंपरी चिंचवडमधील ५६ रुग्‍णांवर उपचार सुरू आहेत. दररोज तीन ते पाच रुग्‍ण बरे होऊन घरी जात असून, एक किंवा दोन नवीन रुग्‍णांची नोंद होत आहे. म्‍हणजेच निदान होणाऱ्यांच्‍या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्‍णांची संख्‍या एकंदरीत वाढली आहे.

याबाबत दीनानाथ मंगेशकर रूग्‍णालयाचे मेंदुविकारतज्‍ज्ञ डॉ. श्रीपाद पुजारी यांना विचारले असता ते म्‍हणाले की, या रुग्‍णांचे चांगले वैद्यकीय उपचारांचे व्‍यवस्‍थापन केल्‍याने ते बरे होऊन घरी जात आहेत. बरे झालेल्‍यांची हातापायांची हालचालही होते, परंतु त्‍यांना दोन ते सहा आठवडे आजाराच्‍या तीव्रतेनुसार फिजिओथेरपी घेण्‍याची गरज पडते. दोन ते तीन महिन्यांत ते चालू शकतात व दैनंदिन स्‍वतःची सर्व काम करू शकतात. दोन ते चार महिन्‍यांत पुन्‍हा कामावर रुजू होऊ शकतात. अगदी दोन टक्‍के रुग्‍ण असे असतात की, त्‍यांची काहीच हालचाल होत नाही, तर बहुतांश रुग्‍ण योग्‍यरितीने बरे झालेले आहेत.

...............
‘जीबीएस’ सद्यःस्थिती ः
नवे रुग्ण ः ०
एकूण रुग्‍ण ः २११ (पुणे शहर – ४२, शहरात नव्‍याने समावेश झालेल्‍या गावातील रुग्‍ण – ९४, पिंपरी चिंचवड – ३२, पुणे ग्रामीण – ३३, इतर जिल्ह्यातील – १०)
अतिदक्षता विभागात ः ३६
‘व्‍हेंटिलेटर’वर ः १६
बरे झालेले ः १४४
मृत्‍यू ः ११
................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

SCROLL FOR NEXT