पुणे

‘एमआयटी एडीटी’च्या विद्यार्थ्यांचे हॉरिझॉन एआय हॅकेथॉनमध्ये यश

CD

पुणे, ता. २५ : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ कॉम्प्युटिंगच्या (एमआयटी एसओसी) विद्यार्थ्यांनी हॉरिझॉन एआय हॅकेथॉन या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले. अमेरिकेतील मियामी विद्यापीठाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत ‘सिकल सेल डिटेक्टर’ या नावीन्यपूर्ण प्रकल्पासाठी मधुर पाटील, अनुराग अहिरराव, अर्णव बुळे आणि निधी फोफळीये यांचा समावेश असलेल्या संघाने तिसरा क्रमांक पटकावत एक हजार डॉलर्सचे पारितोषिक जिंकले आहे.

‘सिकल सेल डिटेक्टर’ हा एक अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित उपाय असून, जो सिकल सेल आजाराचे वेळीच आणि अचूक निदान करण्यासाठी तयार केला आहे. विशेषतः दुर्गम आणि आरोग्य सुविधांचा अभाव असलेल्या भागांमध्ये हा प्रकल्प मोठी मदत करू शकतो. एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने त्वरित निदान आणि उत्तम उपचार पद्धती उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी प्रा. डॉ. रंजना काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्यांचे उत्कृष्ट प्रदर्शन करत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली.
विद्यार्थ्यांच्या या यशानंतर विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, डॉ. सुरेश कापरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : माढा तालुका पंचायत समितीवर भाजप आणि अजित पवार गटाची सत्ता

Kirit Somaiya : बांगलादेशींना शोधण्यासाठी तीन वर्षातील जन्मदाखले तपासा; किरीट सोमय्या यांनी घेतली महापालिकेत बैठक

Naresh Mhaske : सुज्ञ जनतेने काँग्रेस आणि आघाडीला धुळ चारली; नरेश म्हस्के यांचे विरोधकांवर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT