पुणे

सर्व आवृत्यांसाठी SIILC च्या लोगोसह वापरावी

CD

आजच्या डिजिटल युगात LinkedIn वर ओळख कशी सादर होते, यावर करिअर आणि व्यवसायाची दिशा ठरते. या पार्श्वभूमीवर लिंक्डइन मास्टरक्लास - ऑनलाइन कार्यशाळा १४ जून रोजी आयोजिली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि लिंक्डइनचा प्रभावी वापर शिकवणारी ही कार्यशाळा प्रोफाइल अपडेट करणे, व्हायरल कंटेंट तयार करणे, योग्य लीड्स मिळवणे, आणि नोकरीच्या शोधात यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन करेल. लिंक्डइन अल्गोरिदमचे हॅक्स, स्मार्ट नेटवर्किंग आणि भविष्यातील लिंक्डइन धोरण यांची माहिती देण्यात येणार आहे. TEDx स्पीकर आणि आंतरराष्ट्रीय एआय कोच ऋषिकेश पंडित हे कार्यशाळेला मार्गदर्शन करतील. विद्यार्थ्यांसाठी, नोकरी शोधणाऱ्यांसाठी, सध्या काम करत असलेल्या प्रोफेशनल्ससाठी, उद्योजक आणि फ्रीलान्सर्ससाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे. आजच्या काळात लिंक्डइन हे केवळ जॉब पोर्टल नसून, एक पॉवरफुल ब्रँड बिल्डिंग प्लॅटफॉर्म आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

क्लाउड किचन व्यवसायाद्वारे वाढवा उत्पन्न
कमी गुंतवणुकीत स्वतःचा क्लाउड किचन व्यवसाय कसा सुरू करायचा याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा १५ जून रोजी आयोजिली आहे. क्लाउड किचन हा जास्त पैसे खर्च न करता अन्न व्यवसाय चालवण्याचा एक नवीन मार्ग आहे. क्लाउड किचनमध्ये व्यावसायिक स्वयंपाकघरातील जागा वापरून फक्त डिलिव्हरी किंवा टेकअवेसाठी अन्न तयार केले जाते, ज्यामध्ये संपूर्ण रेस्टॉरंट सेटअपची आवश्यकता नसते. यामुळे हा खूप स्वस्त आणि सुरुवात करण्यास सोपा असा व्यवसाय आहे. कार्यशाळेत स्वतःचा क्लाउड किचन ब्रँड कसा सुरू करावा, घरून मेस किंवा कॅन्टीन कसे चालवावे, कॅफे किंवा रेस्टॉरंट्सद्वारे स्वयंपाकघर कसे व्यवस्थापित करावे, स्वच्छता आणि सुरक्षितता कशी राखावी यासह सरकारी नियम, परवाने आणि नियम याबाबत मार्गदर्शन होणार आहे. ज्यांना हॉटेल, टिफिन सेवा किंवा मेस व्यवसाय उघडायचा आहे, परंतु मोठे बजेट नाही त्यांच्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे. कुठलीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसणारेही कार्यशाळेत भाग घेऊ शकतात.
संपर्क : ८४८४८११५४४

वास्तुशास्त्र नियोजनाविषयी कार्यशाळा
वास्तुशास्त्रानुसार घर, ऑफिस वा दुकान कसे असावे आदींबाबत माहिती करून देणारी ऑनलाइन कार्यशाळा १६ जूनपासून आयोजिली आहे. घर वास्तू दोषमुक्त असावी ही इच्छा बाळगणाऱ्या सर्वांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे. कार्यशाळेत वास्तुशास्त्र काय आहे, वास्तुदोष कोणते आहेत, त्याचे परिणाम कोणाला जाणवतात, दिशा, उपदिशा, अधिपती देवता आणि पंचतत्व, दिशा आणि प्रभाव, वास्तुपुरुष मंडल, मर्मस्थान, उपमर्मस्थान, जमीन कशी निवडावी, घर नक्की कोठे व कसे बांधले पाहिजे, घर बांधण्यास प्रारंभ कसा करावा, घरातील अंतर्गत रचना कशी असावी, मुख्य दरवाजाची दिशा ओळखणे, दरवाजा कोठे करावा, वास्तुचे आयुष्य आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईतील रेल्वेट्रॅक पाण्याखाली, पावसाने शहर ठप्प! घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा...

'मला त्याचा 'तो' भाग खूप आवडतो' अभिनेत्रीला नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टबद्दल कमेंट करणं पडलं महागात, नेटकरी म्हणाले, 'हेच का संस्कार'

Mumbai : शिकायला लंडनला जायचं होतं, त्याआधीच बिझनेसमनच्या १७ वर्षीय लेकीनं संपवलं आयुष्य; २३ मजली इमारतीवरून मारली उडी

Rule 72 Explained: तुमचे पैसे किती दिवसात दुप्पट होणार? Rule No. 72 सांगतोय तुमचं आर्थिक भविष्य

Dahi Handi 2025 Celebration: गो गो गोविंदा...! दहीहंडी उत्साहात साजरी करण्यासाठी 'या' सेफ्टी टीप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT