पुणे

दुसऱ्या मजल्‍यावरून पडलेल्‍या चिमुरडीला जीवनदान

CD

पुणे, ता. ११ : खेळता खेळता दुसऱ्या मजल्‍यावरील बाल्‍कनीतून पडलेल्‍या तीन वर्षांच्‍या गायत्री सूर्यवंशी हिच्‍या कवटीला जबर दुखापत झाली. औंध येथील खासगी रुग्‍णालयात डॉक्‍टरांनी केलेल्‍या उपचारांनी तिला नवीन जीवन मिळाले.
पिंपरी चिंचवडमधील मोशी येथील घरामध्‍ये खेळत असताना ही घटली घडली. त्यात गायत्री बेशुद्ध झाली. एकुलत्या एक असलेल्‍या गायत्रीला पालकांनी औंध येथील अंकुरा हॉस्पिटल फॉर वूमन अँड चिल्ड्रनमध्‍ये तातडीने दाखल केले. सीटी स्कॅन तपासणीमध्ये तिच्‍या कवटीचे हाड फ्रॅक्चर झाल्‍याचे आढळले. तसेच मेंदूवर दाब येऊन स्थिती गंभीर झाल्‍याने तिच्‍या जिवावरही बेतण्‍याची शक्‍यता होती. डॉक्‍टरांनी मेंदूवरील दाब कमी करण्यासाठी व कवटीतील रक्ताची गाठ काढण्यासाठी आपत्कालीन तातडीची तासभर शस्त्रक्रिया केली. त्यातून तिच्या जिवाचा धोका टळला. गायत्रीवर बालरोग अतिदक्षता तज्ज्ञ डॉ. मिलिंद जंबगी, बाल न्युरोलॉजिस्ट डॉ. शिजी चालीपट आणि न्यूरोसर्जन डॉ. अभिजित घंगाळे यांच्या पथकाने उपचार केले. डॉ. घंगाळे म्‍हणाले की, ‘‘मुलांमध्ये मेंदूला दुखापत झाल्यावर प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. उपचारात विलंब झाल्यास गंभीर मेंदुविषयक समस्या उद्‍भवू शकतात. गायत्रीला वेळीच उपचार मिळाल्याने तिचा पुनर्जन्म झाला.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरणानंतर राज्यभर कारवाईचा धडाका; महिन्यात 15 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल, नाव-गावासह 'अंनिस'ने यादीच केली जाहीर

IPL 2026 : स्टार खेळाडूंसोबत शेवटचा'सेल्फी'! १४ वर्षीय अभव, २० वर्षीय क्रिकेटपटूचा जागीच मृत्यू; DC vs RCB सामन्यानंतर भयानक घडलं

ओबेन इलेक्ट्रिककडून Rs. 99,999 रूपये या सुरुवातीच्या किमतीत Rorr EVO सुपर बाइक लाँच; दमदार फीचर्स पाहा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील खुपिरे येथील सुरभी लॉजवर पोलिसांचा छापा

MLC Election: झीशान सिद्दीकींच्या उमेदवारीमुळे वाद पेटला; एक बडा नेता शिवसेनेकडे वळला? तर दुसरा दुखावला, राष्ट्रवादीत बंडाची चाहूल!

SCROLL FOR NEXT