पुणे, ता. ११ : गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम भागात कायमच शिक्षकांची उणीव भासते. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. हीच उणीव दूर करत पुणेकरांच्या वतीने गडचिरोलीतील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल लायब्ररी देण्यात आली. यामध्ये दोन शाळांना शैक्षणिक ॲप अपलोड केलेले ई लर्निंग सेट आणि लायब्ररीसाठी विविध पुस्तके भेट देण्यात आली.
जनहित चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्सव समिती, पुणे च्या पुढाकाराने सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधन मंडळ येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, ट्रस्टचे प्रकाश ढमढेरे, शिरीष मोहिते, उदय जगताप, पियुष शहा, नीलेश खाणेकर आदी उपस्थित होते. संस्थेतर्फे पाच गो शाळांना सकस आहार देखील प्रदान करण्यात आला. लायन्स क्लब ऑफ सारसबाग यांनी उपक्रमात सहभाग घेतला होता. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश ढमढेरे व उत्सव समितीचे अध्यक्ष पियुष शहा यांनी संयोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.