पुणे, ता. १४ ः नागरिकांचा वाहन खरेदी करण्याचा निर्णय अधिक सोपा करत त्यांना वाहनांचे विविध पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या ‘सकाळ ऑटो एक्स्पो २०२५’चे उद्घाटन पुण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्या हस्ते शनिवारी झाले. हा एक्स्पो रविवारपर्यंत (ता. १५) सर्वांसाठी खुला आहे.
सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित या दोन दिवसीय एक्सपोमध्ये २० हून अधिक ब्रँडचे ६० पेक्षा अधिक दुचाकी व चारचाकी वाहनांचे प्रकार नागरिकांना पाहण्यास मिळतील. तसेच पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक वाहने आणि दुचाकींचे विविध बजेटमधील अनेक पर्याय येथे उपलब्ध आहेत. एक्स्पोचे उद्घाटन झाल्यावर वाहन खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. तसेच मोटारी, दुचाकी यांची नवी मॉडेल्स पाहण्यासाठी नागरिकांमध्ये उत्सुकता होती. येथे उपलब्ध असलेल्या टेस्ट राईडचाही आनंद नागरिक घेत होते. वाहन खरेदीसाठी येथे पावसाळ्यानिमित्त आकर्षक ऑफर्सही ग्राहकांना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याचीही माहिती नागरिक आवर्जून घेत होते.
राजर्षी शाहू सहकारी बॅंक लिमिटेड हे एक्स्पोचे बॅंकिंग पार्टनर आहेत. या एक्सपोच्या उद्घाटनाप्रसंगी राजश्री शाहू सहकारी बँकेच्या ज्येष्ठ संचालिका मंगल जाधव, संचालिका कुसुम आडसुळे, मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब डोईफोडे, कर्ज विभाग प्रमुख अनंत कावाणकर, बी. यू. भंडारीचे सरव्यवस्थापक अमोल सोमा, नमःशिवाय हिरोचे व्यवस्थापकीय संचालक शिव ओम, डेक्कन होंडाचे संचालक जय बाफना, तुनवाल समूहाच्या सेल्स हेड तेजस्विनी घोणे आदी उपस्थित होते.
हे लक्षात ठेवा
- कधी : रविवार (ता. १५ जून)
- कुठे : पंडीत फार्म, डीपी रस्ता, कर्वेनगर
- केव्हा : सकाळी १० ते रात्री ८
- प्रवेश व पार्किंग मोफत
देशाच्या विकासाबरोबर वाहनांची संख्यादेखील वाढत आहे. वाहन खरेदी करण्यासाठी सकाळ माध्यम समूहाने एक उत्कृष्ट व्यासपीठ नागरिकांना उपलब्ध करून दिले आहे. याचा लाभ जास्तीत जास्त पुणेकरांनी घ्यावा. सकाळ माध्यम समूहाच्या या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा.
- मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त, पुणे
सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित या स्तुत्य उपक्रमात पुणेकरांना वाहनांच्या खरेदीसाठी बॅंकेतर्फे आकर्षक ऑफर मिळतील. तसेच इलेक्ट्रिक वाहनांचा खरेदीसाठी विशेष सवलत आहे. पुणेकरांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि या एक्स्पोला भेट द्यावी.
- बाळासाहेब डोईफोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, राजश्री शाहू बँक
आमची उत्पादने आणि सेवा प्रदर्शित करण्यासाठी ‘सकाळ ऑटो एक्स्पो’ हे प्रभावी व्यासपीठ आहे. एकाच छताखाली अनेक ब्रँडची उपस्थिती असणे हे ग्राहकांच्या फायद्याचे आहे. या एक्स्पोमध्ये आम्हाला ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतो. या एक्स्पोमुळे ग्राहकांना वाहन खरेदी करणे अधिक सोपे झाले आहे.
- जय बाफना, संचालक, डेक्कन होंडा
सकाळ ऑटो एक्स्पोमध्ये आम्हाला नवीन ग्राहकांपर्यंत पोहचण्याची संधी मिळते. यावर्षी ढोणे किया नवीन ‘किया कॅरेन्स क्लावीस’ ही अत्याधुनिक चारचाकी येथे सादर करीत आहे. पुणेकरांनी आपला सहभाग दर्शवून या अत्याधुनिक कार व सकाळ ऑटो एक्सपोला भेट द्यावी.
- वसीम हूरझूक, बिझनेस हेड, ढोणे किय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.