पुणे

चोरी, घरफोडीचे सत्र सुरूच

CD

पुणे, ता. १४ ः शहरात चोरी, घरफोडीचे सत्र सुरूच आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांत झालेल्या चोरी व घरफोडीच्या विविध घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे ३० लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहरात मागील काही दिवसांपासून चोरी, घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बंद घरांपासून दुकाने, सराफी दुकानांना चोरट्यांकडून लक्ष्य केले जात आहे. रविवार पेठेतील एक सराफी दुकान चोरट्यांनी फोडले. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १३) पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोंढवा खुर्द येथील ३५ वर्षीय नागरिकाने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे रविवार पेठेमध्ये सराफी दुकान आहे. गुरुवारी नेहमीप्रमाणे दैनंदिन व्यवहार पूर्ण झाल्यानंतर रात्री दुकान बंद करून ते गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले. चोरट्यांनी दुकानाच्या दरवाजाचा कडी व कोयंडा तोडून दुकानातील एक लाख ३५ हजार रुपयांची रोख रक्कम व सोने-चांदी, हिऱ्याचे दागिने असा १४ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे त्यावेळी उघडकीस आले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक शिवराज होळे करत आहेत. चंदननगर येथे सदनिकेमध्ये चोरीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी ३७ वर्षीय व्यक्तीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीची चंदननगर येथील तत्त्व सोसायटीमध्ये सदनिका आहे. गुरुवारी ते सदनिका बंद करून बाहेर गेले होते. शुक्रवारी (ता. १३) पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी बेडरूमच्या कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ११ लाख ५८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

घरकाम करणाऱ्या महिलेकडून दागिन्यांची चोरी
मार्केट यार्ड येथील बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील लक्ष्मीनारायण रेसिडेन्सी येथील ५८ वर्षीय नागरिकाने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात चोरीप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या घरी काम करणाऱ्या महिलेने त्यांची नजर चुकवून बेडरूमच्या ड्रेसिंग टेबलामध्ये ठेवलेले साडेतीन लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. हा प्रकार निदर्शनास आल्याने फिर्यादी यांनी पोलिस ठाणे गाठले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs AUS 2nd T20I: २० चेंडूंत ९६ धावा! डेवॉल्ड ब्रेव्हिसचे विक्रमी शतक; ऑस्ट्रेलियाला झोडले, अनेक विक्रम मोडले Video

न्यू यॉर्कच्या इंडिया डे परेडसाठी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाची निवड; सह-ग्रँड मार्शल म्हणून करणार भारताचं प्रतिनिधित्व

Latest Maharashtra News Updates Live: टपाल विभागाची ५७ वी पेन्शन अदालत १५ सप्टेंबर रोजी मुंबईत

Pune Crime: ''अरुण गवळीचा पीए बोलतोय, ५ कोटी दे'', पुण्यात तोतया गँगचा पर्दाफाश, तिघेही बीडचे

Nashik Crime : नाशिकमध्ये घरफोडीचे सत्र सुरूच; एका रात्रीत तीन ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारला

SCROLL FOR NEXT