पुणे

पुण्यात ‘वारकरी भक्तियोग’ उपक्रम

CD

पुणे, ता. १६ : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या २१ जून रोजी पुण्यात मुक्कामी आहेत. याच दिवशी जागतिक योग दिन साजरा केला जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या पुढाकाराने पुण्यात ‘वारकरी भक्तियोग’ उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लाखो वारकरी, विद्यार्थी, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील नागरिक योगासने करणार आहेत. या उपक्रमात सुमारे १० लाख जण सहभागी होतील, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र सरकार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महापालिका, राष्ट्रीय सेवा योजना, श्रीक्षेत्र आळंदी, श्रीक्षेत्र देहू, विद्यार्थी विकास मंचातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी पत्रकार परिषदेत (ता. १६) ही माहिती देण्यात आली. पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. अशोक उबाळे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य देविदास वायदंडे, डॉ. नितीन घोरपडे, डॉ. धोंडीराम पवार, प्राचार्य डॉ. संजय चाकणे आदी उपस्थित होते.
मुख्य कार्यक्रम पुणे विद्यापीठाच्या सभागृहात सकाळी आठ वाजता देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होईल. या उपक्रमात शहरात सुमारे पाच लाख वारकरी, पुणेकर सहभागी होतील. या उपक्रमात शहरातील २०० हून अधिक महाविद्यालये, २५ विद्यापीठे, विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष आणि गणेश मंडळांचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, असे पांडे यांनी सांगितले. या उपक्रमात मदत करण्यासाठी प्रत्येक दिंडीसोबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे एक पथक सोबत असणार आहे, असे पांडे यांनी सांगितले.

स्वयंसेवकांनी नोंदणी करावी
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थी कल्याण अधिकारी, रासेयो कार्यक्रम अधिकारी आणि प्रत्येक दिंडीमध्ये सहभागी होणारे किमान २० विद्यार्थी, स्वयंसेवकांची नावनोंदणी करावी. ही नोंदणी https://bcud.unipune.ac.in/NSS/NSS_Registration/Bhaktiyog_Registration.aspx या लिंकवर करावी, त्यामुळे सहभागी व्यक्तींना प्रमाणपत्र, टोपी व टी-शर्ट देता येतील, असे पांडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Scam : लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतलेल्या लाभार्थ्यांकडून सरकार वसूल करणार रक्कम; जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश

Fifa World Cup 2026: दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला, Mumbai Indians कडूनही जोरदार सेलिब्रेशन; दोघांचं नेमकं काय कनेक्शन?

RTI Andolan: अण्णा हजारे आक्रमक! आरटीआय कायद्याविरोधात पुन्हा देशव्यापी आंदोलनाचा इशारा; राळेगणसिद्धीत चर्चा निष्फळ

रोमान्स, हॉरर आणि भावनांचा संगम; सई मांजरेकरच्या 'इकाई'लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Latest Marathi News Live Update : महायुतीतील २१८ मतांची गूढ फूट; पराभवानंतर भाजपकडून चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT