पुणे, ता. १७ : आजच्या काळात फळप्रक्रिया उद्योग हा नफा आणि स्थैर्य देणारा पर्याय ठरत आहे. कमी गुंतवणुकीत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे तीन दिवसीय प्रशिक्षण २१ जूनपासून आयोजिले आहे. यात फळप्रक्रियेतील व्यावसायिक संधी ओळखणे, व्यवसाय सुरु करण्यासाठीचे टप्पे आणि शासकीय योजनांचा लाभ, मशिनरी, परवाना आणि पॅकेजिंगचे ज्ञान, जॅम, जेली, स्क्वॉश, सिरप, पल्प आणि डिहायड्रेटेड फळप्रक्रियांचे प्रात्यक्षिक, महत्त्वाची सूत्रे, टिप्स आणि व्यावसायिक सल्ले आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे. थेट फूड इंडस्ट्रीला भेट देऊन प्रात्यक्षिक अनुभव घेण्याची संधी उपलब्ध आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
शेवगा लागवड, उत्पादन व निर्यात संधी
स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात नियमित मागणी असणाऱ्या शेवग्याचा आयुर्वेद औषधींमध्येही वापर वाढला आहे. शेवगा पिकाच्या आधुनिक लागवड पद्धती, पीक व्यवस्थापन व निर्यात व्यवस्थापनाबाबत माहिती करून देणारी कार्यशाळा २२ जूनला आयोजिली आहे. यात निर्यातक्षम शेवगा उत्पादन पद्धती, आधुनिक जाती, खत व पाणी व्यवस्थापन, छाटणी, फुलोरा अवस्था, काढणी व्यवस्थापन, निर्यातीच्या संधी, निकष, ट्रेसिबिलीटी, शेवगा निर्यातीसाठी गुणवत्तेची पडताळणी, परकीय बाजारपेठा, शेंगांचा देठ किती व कसा ठेवावा, रसायनमुक्त उत्पादन, निर्यातीसाठी कागदपत्र, देशनिहाय निर्यातीचे नियम इ. संदर्भात नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क : ८४८४८११५४४
ड्रॅगनफ्रुट, अॅव्होकॅडो व ब्लूबेरी लागवड कार्यशाळा
ड्रॅगनफ्रुट, अॅव्होकॅडो व ब्लूबेरी या फळांना भारतीय बाजारामध्ये त्यांच्यातील उच्च पोषक तत्वांमुळे मागणी आहे. निर्यातीसाठी आणि सुशिक्षित लोकांमधील वाढत्या आरोग्य जागरूकतेने ही फळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायद्यात आणण्यास सक्षम आहेत. अनेक आजारांना दूर ठेवणाऱ्या या गुणकारी फळांची लागवड कशी करावी, गुणवत्तापूर्ण उत्पादन कसे घ्यावे व उत्पादकता कशी वाढवावी, मातीची तयारी व साईटची निवड कशी करावी, रोपांची काळजी कशी घ्यावी, उत्पादनानंतर मार्केटिंग स्ट्रॅटेजी कोणत्या वापराव्या व नफा कसा कमवावा याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा २३ जूनला आयोजिली आहे. यामध्ये या फळांची उत्पादन पद्धती व अर्थशास्त्र, रोग व त्यांचे व्यवस्थापन, उत्पादन व गुणवत्तेसाठी उपाययोजना, विविध जाती आणि त्यांची निवड, लागवडीचे तंत्र, पोषण व्यवस्थापन व सिंचन पद्धती, कीड व रोग व्यवस्थापन, छाटणी, काढणी व काढणीनंतरची हाताळणी आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
जुन्या इमारतींचा पुनर्विकास
यूडीसीपीआर नियमामुळे महाराष्ट्रात मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या इमारतींचा पुनर्विकास (रीडेव्हलपमेंट) सुरु आहे किंवा होणार आहे. हा नियम काय आहे? त्यामुळे एफएसआय कसा व किती वाढला? त्याचा वापर कसा करायचा? व्यवहार्यता अहवाल कशासाठी काढतात? पीएमसी म्हणजे काय? आदींबाबत मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा २९ जूनला आयोजिली आहे. यामध्ये इमारतींचा पुनर्विकास करण्याची पद्धत, त्यासाठीचे पेपर्स, विकसक कसा निवडावा, जुन्या सभासदांना होणारे फायदे, करारनामा कसा करावा, महारेरा नोंदणी आदी सर्व मुद्यांचे सखोल मार्गदर्शन होणार आहे. सोसायटी स्वयंपुनर्विकास करू इच्छिणारे, नवीन विकसक, ज्यांना पुनर्विकास क्षेत्रात रस आहे असे सर्वजण, स्थावर संपदा अभिकर्ते यांच्यासाठी कार्यशाळा उपयुक्त आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.