पुणे

उर्वरित विद्यार्थ्यांचे आधार १५ एप्रिलपर्यंत प्रमाणित करा

CD

पुणे, ता. ४ : राज्यातील शाळांमधील एकूण ९४.७२ टक्के विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक प्रमाणित झाले आहेत. विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणित न होणे, आधार कार्ड उपलब्ध नसणे, यामुळे अद्याप हे काम १०० टक्के पूर्ण झालेले नाही. म्हणून आता उर्वरित पाच टक्के विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक प्रमाणित करण्यासाठी १५ एप्रिलपर्यंतची अंतिम मुदत शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली आहे.
राज्यात सर्व विभाग, सर्व माध्यमे आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीमध्ये शिकणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांचे ‘युडायस प्लस’ आणि ‘सरल’ पोर्टलमधील स्टुडंट पोर्टलवर आधार नोंदणी अद्ययावत करण्याचे काम पूर्ण करून संबंधित विद्यार्थ्याच्या आधार क्रमांकाची खात्री करणे आवश्यक आहे. यासाठी राज्य स्तरावरून शिक्षणाधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत. मात्र, अद्यापही ही प्रक्रिया १०० टक्के पूर्ण झालेली नाही. म्हणूनच आता उर्वरित पाच टक्के विद्यार्थ्यांची आधार नोंदणीबाबत खुद्द शिक्षण आयुक्तांनीच संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे सूचना देत धारेवर धरले आहे. विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करण्यासाठी शाळा, केंद्र व तालुका स्तरावर नियोजन करावे. त्यासाठी तालुका स्तरावरून काही शाळांसाठी एक नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असा आदेश सिंह यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे.

‘अपार आयडी’ची कार्यवाहीदेखील पूर्ण करावी
आधार प्रमाणित करण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षक, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी यांच्या मदतीने कार्यवाही करावी. तसेच ‘युडायस प्लस’ आणि ‘सरल’ पोर्टलवर आधार प्रमाणित करण्यात मागे असलेल्या शाळा पाहता येतात. या आधारे नियमितपणे आढावा घेऊन प्रत्येक शाळेचा पाठपुरावा करून आधार प्रमाणिकरणाची कार्यवाही पूर्ण करता येईल. तसेच आधार प्रमाणित झालेल्या विद्यार्थ्यांच्या ‘अपार आयडी’ची कार्यवाही देखील पूर्ण करावी, असेही सिंह यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT