पुणे

अवती भवती

CD

भानुदास कटके यांना
राज्यस्तरीय पुरस्कार
पुणे, ता. ४ : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत सासवड येथील प्रा. भानुदास कटके यांना अहिल्यानगर येथे आयोजित केलेल्या तिसऱ्या ग्रामीण साहित्य संमेलनात राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला. या वेळी विदर्भातील ज्येष्ठ साहित्यिक केशव देशमुख उपस्थित होते.
.................
पीएमपी प्रवासी मेळाव्याचे
रविवारी आयोजन
पुणे, ता. ४ : सजग नागरिक मंच आणि पीएमपी प्रवासी मंच यांच्या संयुक्त सहभागाने पीएमपी अध्यक्षांशी प्रवाशांचा बससेवेसंबंधी थेट संवाद व्हावा, याउद्देशाने पीएमपी प्रवासी मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा येत्या रविवारी (ता. ६) सायंकाळी पाच ते सात यावेळेत बीएमसीसी रस्त्यावरील आयएमडीआर सभागृहात होणार आहे. मेळाव्यात पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विवेक वेलणकर व जुगल राठी यांनी दिली.
........
पीएमपी कोथरूड आगारात
वाहक-चालकांचा सत्कार

पुणे, ता. ४ : कोथरूड येथील विविध ज्येष्ठ नागरिकांकडून पीएमपीच्या कोथरूड आगारामध्ये कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या सेवकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी आगारप्रमुख राजेंद्र गाजरे, पुरुषोत्तम मालू, प्रीतम मालू, प्रतीक मालू, आशिष बाहेती, अॅड. आशिष संचेती, हिमेश बाहेती उपस्थित होते. गाजरे म्हणाले की, पीएमपी बसमध्ये प्रवाशांच्या हरविलेल्या वस्तू परत आगारामध्ये देणे, प्रवाशांसोबत व्यवस्थित संवाद साधणे, यामध्ये चालक-वाहकांचे कार्य कौतुकास्पद आहे. चांगले काम करणाऱ्यांची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले, तर आणखी चांगले काम त्यांच्याकडून होऊ शकते.
.............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Parishad Election : अंबादास दानवेंसाठी काँग्रेसनं घेतली माघार; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा देताना 'मविआ'मध्ये नक्की कोणती झाली 'डील'?

Artificial Mango Ripening : सावधान! तुम्ही खाल्लेला आंबा नैसर्गिक की केमिकलने पिकवलेला? 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Love Numerology : प्रेमात पक्के 420 असतात 'या' 3 मुलांकाचे लोक; तुमच्या पाठीत कधी खंजीर खुपसतील कळणारही नाही

Latest Marathi News Live Update : भाजप सर्व राज्यांमध्ये विजयी होईल- स्वाती मालीवाल

India Census 2026 : राज्यात १ मे पासून जनगणना, विचारले जाणार 'हे' प्रश्न; चुकीची माहिती दिल्यास होणार तब्बल 'इतका' दंड

SCROLL FOR NEXT