पुणे

सदनिकेचा ताबा मिळेपर्यंत द्यावे लागणार विलंब शुल्क

CD

पुणे, ता. २४ ः मुदतीत सदनिकाधारकांना सदनिकेचा ताबा न दिल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाला महाराष्ट्र स्थावर संपदा नियम प्राधिकरणाने (महारेरा) दणका दिला आहे. सदनिकाधारकांनी भरलेल्या रकमेवर ताबा मिळेपर्यंतच्या विलंबाच्या कालावधीसाठी व्याज देण्याचे आदेश ‘महारेरा’चे सदस्य महेश पाठक यांनी दिले आहे.

तक्रार दाखल करताना प्रकल्पास भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नव्हते, तसेच ताबा प्रत्यक्षात देण्यात आलेला नव्हता. त्यामुळे, सदनिकाधारकांना विलंब कालावधीसाठी व्याज मिळणे हा कायदेशीर हक्क असल्याचे प्राधिकरणाने नमूद करत ‘महारेरा’चे सदस्य पाठक यांनी सदनिकाधारकांच्या बाजूने निकाल देत त्यांना दिलासा दिला. मुळशी तालुक्यातील ताथवडे येथील एका गृहप्रकल्पात ३४ नागरिकांनी सदनिका खरेदी केल्या होत्या. करारानुसार सदनिकाधारकांना २०२२ मध्ये ताबा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र ताबा देण्यास झालेल्या दीर्घ विलंबामुळे सर्व सदनिकाधारकांनी अॅड. चिन्मय कल्याणकर यांमार्फत महारेराकडे तक्रार केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

Pune Latest News: युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बंदोबस्त वाढवला; शहरात किती इराणी लोक राहतात?

धक्कादायक! आई-वडिल अभ्यास कर म्हणाले, मोबाईल न दिल्याने १३ वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या; मोहोळ तालुक्यातील पेनूरमधील घटना

Latest Marathi News Live Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT