पुणे

एआय आणि डिजिटल व्यवसाय प्रशिक्षण

CD

पुणे, ता. २७ : आजच्या डिजिटल जगात, सोशल मीडिया मार्केटिंग हा कोणत्याही व्यवसायाच्या वाढीचा मार्ग आहे. चॅटजीपीटीसारख्या एआय टूल्ससह मार्केटिंग अधिक स्मार्ट, जलद आणि अधिक प्रभावी होऊ शकते. याबाबत मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण शनिवारी (ता.२९) आयोजिले आहे. हे प्रशिक्षण एआयचा वापर करून चांगला कंटेंट कसा तयार करायचा, सोशल मीडिया प्रेझेन्स आणि प्रभावी कम्युनिकेशन कौशल्य कसे विकसित करायचे हे शिकवेल. ही कौशल्ये शिकल्याने सध्याच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत पुढे राहण्यास आणि मार्केटिंगचे प्रयत्न अधिक यशस्वी होण्यास मदत होईल. प्रशिक्षणात एआयच्या मदतीने प्रभावी व्यावसायिक तंत्र विकसित करणे, प्रभावी बिझनेस प्रोफाइल तयार करणे, मिनी वेबसाइट आणि लँडिंग पेज तयार करणे, प्रभावी कंटेंट तयार करणे, एआय टूल्स वापरून सातपेक्षा अधिक सोशल मीडिया अकाउंट तयार करणे आदींबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

लँडस्केप गार्डनिंग कार्यशाळा
घराच्या आजूबाजूला उपलब्ध जागेमध्ये आकर्षक लँडस्केप गार्डन तयार करण्यासाठी लागणारे ज्ञान, गार्डनचे प्रकार, तयार करण्याची तत्वे, डिझाईन करण्याची पद्धत तसेच झाडांची निवड, गार्डनमधले रस्ते, बॉर्डरला लावली जाणारी झाडे व व त्यांची निवड आदींविषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा शनिवार (ता. २९) व रविवारी (ता. ३०) आयोजिली आहे. यात लँडस्केप गार्डनिंगचा परिचय, गार्डनमध्ये झाडांच्या वेगवेगळ्या डिझाइन तयार करण्याच्या पद्धती, साइटचे मुल्यांकन व तयारी, लँडस्केपिंग टेक्निक्स, खत व पाणी नियोजन, देखभाल पद्धती, पर्यावरणविषयक विचार, क्लायंट कम्युनिकेशन आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट, सुरक्षा आणि नियम, लँडस्केप गार्डनिंगमधील भविष्यातील ट्रेंड आदींविषयी मार्गदर्शन होणार आहे. लँडस्केपिंगमध्ये करिअरच्या संधी शोधणाऱ्यांना तसेच वैयक्तिक बागकामामध्ये स्वारस्य असणाऱ्यांना कार्यशाळा उपयुक्त आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

जमीन गुंतवणूक व पैसा कार्यशाळा
जमिनीचे भाव सतत वाढत असल्याने जमिनीतील गुंतवणूक चलनवाढीलाही मागे टाकणारी खात्रीशीर गुंतवणूक आहे. गुंतवणूक पर्याय म्हणून जमिनीकडे कसे बघावे व त्यातून पैसा कसा उभारावा याविषयी मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा रविवारी (ता. ३०) आयोजिली आहे. कार्यशाळेत जमीन शोध व निवड प्रक्रिया, जमीन प्रकार, झोन दस्तऐवजीकरण, गुंतवणुकीचे पर्याय आणि परतावा, बाजार संशोधन व स्पर्धक विश्लेषण, बँकिंग, कर आणि वित्त, निधी उभारणी, जमीन विकास, मार्केटिंग आणि प्रसार, व्यवस्थापनातून दीर्घकाळ पैसा इ.विषयांवर १०० टक्के व्यवहार ज्ञान, दाखले आणि नोट्ससहित रिअल इस्टेट प्रशिक्षक रोहित गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क : ८९५६३४४४७१

हाउसिंग सोसायटी मॅनेजर प्रशिक्षण
सोसायटी मॅनेजर या करिअर संधीविषयीचे तीन दिवसीय प्रमाणपत्र प्रशिक्षण ४, ५ व ६ एप्रिलला पुणे हाउसिंग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजिले आहे. यामध्ये सोसायटी मॅनेजरची कर्तव्ये, प्रोफाइल आणि जबाबदाऱ्या, मॅनेजिंग कमिटी अजेंडा व मिनिट्स लेखन, गृहनिर्माण संस्थेतील शेअर्स आणि व्याजाचे हस्तांतर, देखभाल बिले तयार करणे, टीडीएस भरणे, ऑडिटसाठी चेकलिस्ट, लेखापरीक्षण अहवाल तयार करणे, सोसायटीचे वार्षिक विवरणपत्र सादर करणे आदी विषयांचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिक अनुभवाची संधीही दिली जाणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास गृहनिर्माण संस्थांमध्ये सोसायटी व्यवस्थापक म्हणून अर्धवेळ किंवा पूर्णवेळ करिअर संधी उपलब्ध होऊ शकते अथवा गृहनिर्माण संस्थांना विविध सेवा देऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.
संपर्क : ९३५६९७३४२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT