पुणे, ता. १ ः खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरले. लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकात हा प्रकार घडला. महिलेने याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पिंपरी-चिंचवडमधील चिखली परिसरात राहायला आहेत. त्या कुटुंबीयांसह शनिवारी (ता. ३१) दुपारी लक्ष्मी रस्ता परिसरात खरेदीसाठी आल्या होत्या. बेलबाग चौकातून त्या हुतात्मा बाबू गेनू चौकाकडे निघाल्या होत्या. गर्दीत चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतून तीन लाख १० हजार रुपयांचे दागिने लांबविले. पिशवीतून दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
पीएमपी प्रवासी महिलेची बांगडी चोरी
पीएमपीने प्रवास करत असलेल्या ज्येष्ठ महिलेच्या हातातील दीड लाखांची सोन्याची बांगडी चोरट्याने चोरून नेली. घटना स्वारगेट परिसरात हा प्रकार घडला. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार या स्वारगेट परिसरातील पीएमपी स्थानकात बसमध्ये प्रवेश करत होत्या. गर्दीत चोरट्याने कटरचा वापर करून महिलेच्या हातातील बांगडी कापली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.