पुणे

पंचवीस हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

CD

पुणे, ता. २५ : वारंवार आवाहन करूनही थकीत वीजबिल न भरल्यामुळे पुणे परिमंडलामध्ये गेल्या २४ दिवसांत २५ हजार ४३४ थकबाकीदारांचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आला. सद्यःस्थितीत सर्व प्रकारच्या वीजग्राहकांकडे अद्यापही ८८ कोटी ४५ लाख रुपयांची थकबाकी आहे. थकीत वीजबिलाचा ताबडतोब भरणा करावा, असे आवाहन ‘महावितरण’कडून करण्यात आले.

पुणे शहरात एकूण घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीजग्राहकांकडे ४० कोटी नऊ लाख रुपयांची थकबाकी आहे. गेल्या २४ दिवसांत १० हजार १७७ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला, तर पिंपरी-चिंचवड शहरात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे १८ कोटी ४० लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यातील सात हजार ७९६ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला, तसेच ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, राजगड, हवेली तालुक्यात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे २९ कोटी ९६ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यातील सात हजार ४६१ ग्राहकांचा वीजपुरवठा गेल्या २४ दिवसांत खंडित करण्यात आला.
वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरित भरणा करावा, असे आवाहन ‘महावितरण’कडून करण्यात आले, तसेच लघुदाब वीजग्राहकांना बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी www.mahadiscom.in वेबसाइट व मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway Accident: सूर्योदय पाहून परतताना क्षणात सर्व संपलं… मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघातात IIT च्या तीन विद्यार्थ्यांचा अंत

US Visa Bond Policy : डोनाल्ड ट्रम्प यांचा ५० देशांना दणका ! व्हिसा बाँड केला अनिवार्य, नेमकं काय आहे प्रकरण ?

Dharashiv:धाराशिवमध्ये गुढीपाडव्याला म्हशी-रेड्यांच्या शर्यतीचा थरार; परंपरेचा जल्लोष

Chhatrapati Sambhajinagar: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घरखरेदीचा उत्साह; २५० गृहप्रवेशासह बाजारात तेजी

विद्यापीठाचा मोठा निर्णय! 'सीसीटीव्ही' असलेल्या कॉलेजमध्येच आता परीक्षा केंद्र; ‘लॉ’ची परीक्षा त्याच महाविद्यालयात, २ एप्रिलपासून परीक्षा, वाचा...

SCROLL FOR NEXT