पुणे

रक्षाबंधनानिमित्त्त ‘सिग्नेट’मध्ये विविध उपक्रम

CD

पुणे : जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या हडपसर संकुलातील सिग्नेट पब्लिक स्कूलमध्ये रक्षाबंधनाचे औचित्य साधून प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे उपक्रम राबविले. चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी तसेच स्काउट अँड गाइडच्या विद्यार्थ्यांनी काळेपडळ पोलिस चौकीअंतर्गत असलेल्या पोलिस ठाण्यातील विविध वरिष्ठ अधिकारी तसेच इतर पोलिस अधिकाऱ्यांना स्वतः बनवलेल्या राख्या बांधल्या. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सर्व अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू दिल्या. तसेच सातवीच्या विद्यार्थ्यांनी ‘द लिलियन स्कूल’ मोहम्मदवाडी रस्ता येथे भेट दिली. या मूकबधिर स्कूलच्या संस्थापिका तारा मेश्रामकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी तेथील मुलांना राख्या बांधून भेटवस्तूही दिल्या. यावेळी संकुलाचे संचालक डॉ. वसंत बुगडे, सहसंचालक मारुती कालबांडे, स्कूल सहसंचालिका अॅग्नेस मॅसक्रेनस्, प्राचार्या कल्पना निलाखे, उपप्राचार्य मंगेश चाटे, पर्यवेक्षका संगीता पाटील, रमा कापडी, वैशाली बधे उपस्थित होते.

गरजूंना शैक्षणिक साहित्य वाटप
पुणे : एरंडवणे येथील भारती विद्यापीठाच्या विजयमाला कदम कन्या प्रशालेतील पाचवी ते नववीच्या गरीब गरजू व होतकरू विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शर्मिला गुंजाळ यांच्या हस्ते विद्यार्थिनींना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. यावेळी वनिता घोरपडे व डॉ. अनुप काळे उपस्थित होते. मुख्याध्यापिका वंदना देशमुख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षिका एस. व्ही. कोळी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन पी. पी. नाईक यांनी केले. शिक्षिका एल. के. महाडिक यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन एल. एम. गुरव यांनी केले. यावेळी प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक ए. टी. पाटील, ए. पी. वाघ. मंजुश्री गायकवाड, कलाशिक्षक जगदीश कुंभार, क्रीडा शिक्षक आर. बी. पवार उपस्थित होते.

कला शिक्षकांची कार्यशाळा उत्साहात
पुणे : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे व सॅटर्डे आर्ट क्लास, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कला शिक्षकांसाठी दोनदिवसीय कला कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, मूलभूत साक्षरता, पर्यावरण शिक्षण, नवभारत साक्षरता, समता, आर्थिक साक्षरता, बोलक्या भिंती यांसारख्या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. प्राचार्य महेश शेंडकर यांनी कला व कला शिक्षक यांचे शाळेतील स्थान व प्रत्येक विषयाशी कलेचा संबंध विशद केला. राज्य मुख्याध्यापक संघाचे सचिव नंदकुमार सागर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड, सचिव क्लासचे संयोजक कृत्तिका खरे, मिताली दीक्षित, प्रियल पत्की, चंद्रकांत गोजेगावे यांनी उपस्थित कला शिक्षकांना मार्गदर्शन केले. समन्वयक म्हणून महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचे माजी उपाध्यक्ष व मएसो सेवक पतपेढीचे संचालक विनोद पारे, राज्य कला क्रीडा संघाचे उपाध्यक्ष किरण सरोदे, वाहिद खान यांनी काम पहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Durga Visarjan Tragedy : दसऱ्याच्या उत्सवाला गालबोट, दुर्गादेवीचे विसर्जन करताना ६ तरुण बुडाले, दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ

Georai News : गेवराईच्या नदीकाठावरील त्या पूरग्रस्तांना चिखलातच दसरा साजरा करण्याची आली वेळ; चिखलाच्या खचाने साफसफाई करण्यासाठी कमी पडला अवधी

Latest Marathi News Live Update : द्राक्ष उत्पादक शेतकरी आक्रमक

Thane News: खबरदार! टिळा आणि बांगड्या घालून याल तर...; खासगी शाळेचा विद्यार्थ्यांसाठी अजब फतवा

US Dollars to INR : जर अमेरिकेतून तुम्ही एक लाख डॉलर आणले, तर भारतात तुमच्या खात्यात एकूण रक्कम...!

SCROLL FOR NEXT