पुणे, ता. १८ : दसऱ्या पाठोपाठ दिवाळीतही पुणेकरांनी नव्या वाहन खरेदीचा उत्साह कायम ठेवला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) दिलेल्या माहितीनुसार, ८ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘आरटीओ’ कार्यालयात एकूण १३ हजार ३८७ नवीन वाहनांची नोंद झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एक हजार १५२ वाहनांची (सुमारे ९. ४ टक्क्यांनी) वाढ झाली आहे. त्यात दुचाकींची खरेदी वाढली असून, चार चाकी वाहनांची खरेदी मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीशी घटली आहे.
यामध्ये दुचाकी वाहनांची नोंदणी सर्वाधिक म्हणजे आठ हजार ७६३ इतकी झाली असून, गेल्या वर्षी ती सात हजार ९११ होती. मालवाहतूक वाहनांची नोंदणी ही ३६८ वरून ६३५ वर पोहोचली आहे. ऑटोरिक्षा या ५४६ इतक्या नोंदविल्या गेल्या आहेत. तसेच पर्यटन टॅक्सीच्या नोंदणीत दुपटीने वाढ होऊन, ती २१८ वरून ४७१ झाली आहे. दरम्यान, मागील वर्षा तीन हजार ११२ चारचाकी वाहनांची नोंदणी झाली होती. मात्र यंदा त्यामध्ये घट झाली असून, दोन हजार ७८६ चारचाकी वाहने नोंदणीकृत झाली आहेत. तसेच ४२ बस आणि १४४ इतर वाहनांची नोंद झाली आहे.
------
‘‘दिवाळीनिमित्त पुणेकरांनी यंदा वाहन खरेदीत विशेष उत्साह दाखवला आहे. सणासुदीच्या ऑफर्स, आकर्षक फायनान्स स्कीम आणि काही वाहनांवरील सरकारी सवलतींमुळे बाजारात उत्साह निर्माण झाला आहे. दुचाकी, ऑटो व पर्यटन टॅक्सीच्या नोंदीत लक्षणीय वाढ झाली आहे.
- स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.
‘‘अलीकडे झालेल्या ‘जीएसटी’ दरकपातीचा थेट परिणाम वाहन विक्रीवर झाला आहे. ग्राहकांना कमी दरात फायनान्ससह वाहन घेणे सोपे झाले आहे. तसेच दिवाळीच्या सणासुदीचा काळ, आकर्षक ऑफर्स आणि स्थिर बाजार परिस्थिती यामुळे विक्रीत लक्षणीय वाढ दिसून येत आहे.
- अनिल चौगुले, डेक्कन होंडा.
‘‘दिवाळीच्या काळात ग्राहकांचा प्रतिसाद अपेक्षेहून जास्त मिळतो आहे. लोक सणासुदीच्या शुभमुहूर्तावर नवीन वाहन घेण्यास प्राधान्य देत आहेत. आकर्षक स्कीम्स आणि ‘ईएमआय’वरील सवलतींमुळे विक्रीत चांगली वाढ झाली आहे.
- शिवओम उणेचा, नमः शिवाय हिरो.
--------
वाहन प्रकार २०२४ २०२५
दुचाकी ७,९११ ८,७६३
चारचाकी ३,११२ २,७८६
ऑटोरिक्षा ४४१ ५४६
पर्यटन टॅक्सी २१८ ४७१
मालवाहतूक वाहने ३६८ ६३५
बस २२ ४२
इतर १६३ १४४
एकूण १२,२३५ १३,३८७
----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.