स्वागत दिवाळी अंकाचे
------- -- ---- --- ------
साहित्य चपराक
प्रिंट, ऑडिओ आणि ई-बुक अशा तिन्ही स्वरूपाबरोबरच संपूर्ण अंकाचे इंग्रजी रूपांतर करणारा अंक हे ‘साहित्य चपराक’ या अंकाचे वैशिष्ट्ये आहे.
‘आम्ही का लिहितो’, या मूलभूत प्रश्नावर भारत सासणे, डॉ. रवींद्र शोभणे, अशोक बागवे, नीरजा, दासू वैद्य आणि गणेश मतकरी या प्रतिभावंतांनी भाष्य केले आहे. जयेंद्र साळगावकर यांनी शिक्षण व्यवस्थेचा झणझणीत आढावा घेतला आहे तर प्रवीण दवणे यांनी निष्ठांतराच्या खेळाचे वर्णन केले आहे. डॉ. वर्षा तोडमल आणि डॉ. आशुतोष जावडेकर यांनी तरुणाईविषयी लिहिले आहे. आश्लेषा महाजन, दीपाली चरेगावकर, संदीप वाकचौरे, मनीषा कुलकर्णी-आष्टीकर यांचे ललित लेख आहेत. नीलिमा बोरवणकर यांनी मुलाखतींचे विश्व उलगडून दाखवले आहे.
अभिराम भडकमकर, श्रीकांत बोजेवार, प्रा. मिलिंद जोशी, अंजली कुलकर्णी, शिरीष चिटणीस, ज्योती घनश्याम, प्रशांत तळणीकर, डॉ. शकुंतला काळे, प्रा. दिलीप फडके, इंद्रजित बागल, पद्मजा फेणाणी-जोगळेकर, अरुण कमळापूरकर, विनायक लिमये, सत्यवान सुरळकर आदींचे संदर्भमूल्य असणारे लेख आहेत. डॉ. सोमनाथ मुटकुळे यांचे नाटक आणि बबन मिंडे यांची नाट्यछटा हेही या अंकाचे वेगळेपण ठरावे. सु. ल. खुटवड यांची धमाल विनोदी कथा आहे. संजय सोनवणी, महेश सोवनी, ऐश्वर्य पाटेकर, चंद्रलेखा बेलसरे, सु. वि. कोळेकर, डॉ. भास्कर बडे आदींच्या दमदार कथासह मान्यवरांच्या कविता, जगदीश कुंटे यांची व्यंगचित्रे आदींमुळे अंक वाचनीय झाला आहे.
संपादक ः घनश्याम पाटील
पाने ः ३७२, मूल्य ः ४०० रुपये
------------------------------------
२) गावगाथा
ग्रामीण संस्कृती जपण्याचे काम कविता, लेख, मुलाखतीच्या माध्यमातून केले जाते. याच संस्कृतीवर आधारित ‘गावगाथा’ हा दिवाळी अंक आहे. ‘आठवणीतील गाव’ या विषयावर आधारित हा अंक आहे. ‘माणुसकी, संस्कृती अन् मातीचा सुगंध’ अशी या अंकाची टॅगलाइन आहे. प्रत्येकाच्या मनात आपल्या गावाचा ठसा उमटलेला असतो, तो समोर येण्याचे व्यासपीठ लेखकांना उपलब्ध करून दिले आहे ‘गावगाथा’च्या माध्यमातून. या अंकाची सुरवात होते पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्या आठवणीतील गाव उपळाई बुद्रुक या लेखाने. याशिवाय तीन पुस्तक नोंदी हा श्रीधर लोणी यांचा लेख, इंद्रजित भालेराव यांचा वरीवाडा, रजनीश जोशी यांचा गावाकडचा मलिन वारा, मनोहारी गाव माझा हा भारती सावंत यांचे लेख वाचनीय आहेत. माधव राजगुरू यांनी ‘माझा जीवनप्रवास’ उलगडला आहे. बैलगाडी ते विमान बदलता प्रवास यावर शेखर गायकवाड यांनी लिहिले आहे. गौरी भालचंद्र, सचिन बेंडभर, संजय ऐलवाड, संध्या धर्माधिकारी, प्रा. डॉ. राजेंद्र रसाळ, अमेय जाधव, वैशाली गावंडे, मयूर दंतकाळे, मंगेश दौंडकर आदींचे लेख व कथा आहेत.
संपादक ः धोंडपा नंदे
पाने ः २१८
किंमत ः २५० रुपये
---------------
३) ऊस मळा
आधुनिक शेतीबरोबरच ऊसपिकांविषयी मार्गदर्शन या अंकात केले आहे. त्याचबरोबर कथा, ललित लेख, कविता, प्रवासवर्णन आदी साहित्यांनीही हा अंक सजला आहे. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता- ऊस उत्पादन वाढविण्याचे आधुनिक तंत्रज्ञान’ या विषयावर डॉ. अभिनंदन पाटील, डॉ. समाधान सुरवसे व डॉ. अशोक कडलग यांनी लिहिले आहे. ‘कृषी उत्पादनासाठी निर्यातीचे महत्त्व या विषयावर प्रकाश शहा यांनी प्रकाशझोत टाकला आहे. शिवारातील सोनं यावर गीता पुरंदरे यांचा लेख आहे. अशोक विधाते, सतीश नेने, डॉ. प्राची क्षीरसागर, सतीश खाडे, रमेश गायकवाड, डॉ. मिलिंद पंडित, डॉ. सुधीर राजूरकर, डॉ. प्राची क्षीरसागर, गीता मांडरे, मीरा भांबुरे, विश्वास देशपांडे, सुनंदा चिपाडे यांचे लेख आहेत. लक्ष्मीकांत रांजणे आणि सुरेशचंद्र वाघ यांच्या कथांनी अंकाची उंची वाढवली आहे. रमेश महाजन, प्रा. सुषमा नानगुडे, शांभवी बोधे, लक्ष्मीकमल गेडाम, डॉ. सुजित धर्मपात्रे यांच्या कविता आहेत. सुचेता महाजन यांचे प्रवासवर्णन वाचनीय आहे.
संपादक ः भाग्यश्री देशपांडे
पाने ः ७४
किंमत ः ८० रुपये
------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.