पुणे, ता. १८ : चाकण-म्हाळुंगे परिसरातील ‘लॉरियाल इंडिया प्रा. लि.’ कंपनीतील लॉरियाल इंडिया कामगार संघटनेतील सर्व कामगार सदस्यांनी एकत्र येत निधी संकलित करून पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’ला एक लाख रुपयांची मदत दिली.
नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याची परंपरा ‘सकाळ रिलीफ फंडा’ने कायम ठेवत राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी समाजाला मदतीचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत अशोका बिल्डकॉन लिमिटेड मित्रमंडळाने २२ हजार ५०० रुपयांची मदत केली, तर पुण्यातील इच्छापूर्ती गणेश मंदिर ट्रस्टतर्फे मूर्ती पुनर्स्थापना सोहळ्यानिमित्त सामाजिक बांधीलकी जपत ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत ‘सकाळ रिलीफ फंडा’ला ११ हजार रुपयांची मदत केली. गुजर-निंबाळकरवाडी येथील लहान मुलांच्या ‘नर्मदा सिटी चिल्ड्रेन्स’ ग्रुपने खाऊ आणि खेळण्याच्या पैशातून वर्गणी गोळा करून एक हजार ५०० रुपयांची रक्कम मदत म्हणून देण्यात आली.
...यांनी केली सढळ हातांनी मदत
सनदी लेखापाल चिंतामण दीक्षित यांच्याकडून एक लाख रुपये, कृषी शिरोमणी स्वर्गीय रावबहादूर नारायणराव बोरावके यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त विरेश बोरावके यांच्याकडून ५० हजार रुपये, खान्देश मराठा मंडळ (पिंपरी-चिंचवड व पुणे परिसर), ज्योतिर्लिंग मित्र मंडळ व विमल पाटील यांच्याकडून प्रत्येकी २५ हजार रु., सौरभ सोशल फाउंडेशनतर्फे २१ हजार रु., संजय नहार व किर्लोस्कर न्यूमॅटिक ज्येष्ठ नागरिक संघाकडून प्रत्येकी २० हजार रु., पाटबंधारे विभाग मित्रमंडळ, पुणे १४ हजार रु., आशुतोष उमराणी यांच्याकडून १५,६२० रु. व नलिनी केंजळकर यांच्याकडून १५ हजार रु.
- ११ हजार रुपये देणारे : डॉ. माणिक देशमुख, शशिकांत चांदगुडे, बिपिन राणा, अनिल कोकीळ, मंगला सासवडे, मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशन (जेएएमके, पुणे), शरद पांडे, सपना राजोरे, सत्यनारायण राजोरे, अतुल राजोरे व इतर, अॅड. सरोज चंद्रात्रे, शाबू मुऱ्हे व सचिन गायकवाड.
- १० हजार रुपये : संदीप पवार, पूनम परदेशी, गौरव गोगावले, शैलजा शिंदे, स्मिता खोपडे, जगन्नाथ बेलोसे, देवेंद्र मारोडे व धनंजय भापकर.
- ५ हजार रुपये : कविता गोसके, शरद पडवळे, अनुराधा आठल्ये, सूर्याजी मोरे, अरुण सावाली, विक्रम शिंदे, अजय बढे, राजेश्री नीओगि, आराधना ख्रिस्ती मंडळी, शमुवेल कदम, निवृत्त पोलिस उपअधीक्षक अशोक इंदलकर, प्रभाकर कुलकर्णी, सुनंदा-शिरीष साबडे, अनंत कोठावळे, वीणा अष्टेकर, अमूल राजोरे, चंद्रकांत कुलकर्णी, मन्नेवार समाज- खडकी व विक्रम शिंदे.
- ३ हजार रुपये : गीता कौजलगीकर व ऋषिकेश शिंगाडे.
- २ हजार रुपये : शीला केसरे, पराग केसरे, नंदा पाटील, नामदेव बर्वे, गणेश मालवणकर, हिरालाल भुजबळ, महानंदा गाडेकर, वसुधा भंडारे, वेंकटेश मालवडकर, शकुंतला-श्यामसुंदर जोशी, पोपट नलावडे व गोरखनाथ काळे.
- एक हजार रुपये : अरविंद झांबरे, समृद्धी तटकरे, अशोक सुपेकर, माधव देशमुख, मंदार पारगी, विनोद शर्मा, पुरुषोत्तम गोवेकर, शहाजी जाधव, प्रफुल्ल परांजपे, श्रीधर आठवडे, राजेश गावडे, सुनंदा मालवडकर, प्रदीप हंपीहळ्ळीकर, नवीनचंद्र नभारिवा, बाजीराव जगदाळे, औदुंबर पाचनकर, सचिन चाफे, वसंत ताराळेकर, शरद थोरात, अजिंक्य पाटील, नरेंद्र वायकर, मयूर शिंदे व अविनाश गांगुर्डे.
- ५०० रुपये : अभिजित पाटील, हरिश्चंद्र गायकवाड, युवराज नागवडे, राजेश वाघमारे, वर्षा महाजन, अजय देसाई, प्रियांका पाटील, सागर अनप, भूषण पाटील, सुरेश शेलार, जगन्नाथ काळे, संदीप मालुसरे, सुनील बडगुजर व देवदास यादव.
याशिवाय आनंद ज्येष्ठ नागरिक संघ (११ हजार १११ रु.), प्राणिमित्र विलास शहा यांच्या ९३ व्या वाढदिवसानिमित्त विवेक शहा यांच्याकडून (९,३९३ रु.), धनश्री जाधव (५,५५५ रु.), कर्नल
मंगेश राजाध्यक्ष व तानाजी- शांता पिसाळ प्रत्येकी (५,१०० रु.), सुहास जोशी व रोहित देसकर प्रत्येकी (२,५०० रु.), वसंत लोखंडे (२,१०० रु.), बाळकृष्ण तोलसनकर (१,९०० रु.), अरुण काळे (१,५०० रु.) व इंदूबाई पासी (१,१०० रु.) यांनी मदत केली.
मदतीचे आवाहन
राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी समाजाला ‘सकाळ रिलीफ फंडा’कडून मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.
मदत करण्यासाठी....
१. IDBI Bank
Name : Sakal Relief Fund
A/C No : 45910010013026
IFSC: IBKL0000459
Branch : Laxmi Road, Pune
या खात्यावर देणगीची रक्कम ऑनलाइन पद्धतीने बँक ट्रान्स्फर करून देणगी देऊ शकता किंवा सोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून गुगल व फोन पेवरून देणगी पाठवू शकता. देणगी बँक खात्यात ट्रान्स्फर केल्यानंतर ८६०५०१७३६६ या व्हाट्सअॅप नंबरवर ट्रान्सझॅक्शन तपशील पाठवावेत.
२. मदतीचे धनादेश ‘सकाळ रिलीफ फंड’ या नावाने दैनिक ‘सकाळ’च्या कार्यालयात ११ ते ५ या वेळेत स्वीकारले जातील.
(‘सकाळ रिलीफ फंड’साठीच्या देणग्या प्राप्तिकर कायद्याच्या ८० जी कलमांतर्गत प्राप्तिकर सवलतीस पात्र आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.