पुणे, ता. १९ ः राज्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतीबरोबरच पशुधनाचे मोठे नुकसान झाले. पूर्वीच्या नियमानुसार केवळ तीन प्राण्यांसाठी मदत दिली जात होती. त्यामध्ये शिथिलता आणून प्रत्येक जनावराच्या मृत्यूची नुकसान भरपाई पशुपालकांना मिळणार आहे.
राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे २८ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पशुधनाचे नुकसान झाले. विविध जिल्ह्यात लहान-मोठे असे एकूण आठ हजार ६७८ जनावरे आणि एक लाख ६४ हजार ८२४ कोंबड्या मृत झाल्या आहेत. या सर्वांना शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागामार्फत नुकसानभरपाई दिली जाणार असून, दुधाळ आणि ओढकाम करणाऱ्या पशुधनाच्या भरपाईवरील तीन प्राण्यांच्या मर्यादा होती. ती आता नसेल. त्यामुळे आता तीनपेक्षा अधिक जनावरांच्या मृत्यूची नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्व मृत पशुधनाला शासन निर्णयानुसार नुकसान भरपाईची प्रक्रिया मदत व पुनर्वसन विभागाद्वारे सुरू आहे. पशुसंवर्धन विभागाद्वारे आजारी आणि जखमी पशुधनावर उपचार सुरू आहेत. यामध्ये पशुधनाची रोगप्रतिकारक क्षमता वाढीसाठी लसीकरण हाती घेण्यात आले असून, ६५ लाख ३२ हजार गोवंशीय आणि ३१ लाख २५ हजार म्हैसवर्गीय पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे. तर ७६ लाख ९९ हजार शेळ्या मेंढ्यांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी दिली.
२७ हजार पशुधन गेले वाहून...
राज्यातील २८ जिल्ह्यांमधील १४२ तालुके आणि ८३७ गावे बाधित झाली आहेत. यामध्ये मोठ्या सुमारे चार हजार ८११ आणि लहान तीन हजार ८६७ पशुधन मृत झाले आहे. एक लाख ६४ हजार ८२४ कोंबड्या मृत झाल्या आहेत. अतिवृष्टीदरम्यान एकूण २७ हजार ३५१ पशुधन वाहून गेले असून, त्यात ८८३ मोठे पशुधन, एक हजार ३२३ लहान पशुधन आणि २५ हजार १४५ कोंबड्यांचा यांचा समावेश आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये राज्याच्या विविध २८ जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. यामध्ये लातूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील १२ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पशुधन मृत झाल्याचे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे.
सर्वाधिक बाधित जिल्हे
धाराशिव, नांदेड, हिंगोली, लातूर, बीड, जालना, सोलापूर, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, वाशीम, यवतमाळ
एवढी मिळणार मदत...
दुधाळ म्हैस गाय - ३७ हजार ५०० रुपये
शेळी, मेंढी ः ४ हजार रुपये
बैल, अश्व - ३२ हजार रुपये
वासरे, कालवडी - २० हजार
कोंबडी - १०० रुपये प्रती
ॊॊॊॊॊाॊ‘‘अतिवृष्टी बाधित क्षेत्रातील मृत पशुधनाच्या नुकसानीची अट शिथिल करण्यात आली आहे. अतिवृष्टीत मृत झालेल्या सर्व पशुधनाला शासन निर्णयानुसार मदत देण्यात येणार आहे.
-डॉ. प्रवीणकुमार देवरे, आयुक्त, पशुसंवर्धन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.