पुणे, ता. १९ : भारतरत्न पं. भीमसेन जोशी, गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतींना संगीताच्या माध्यमातून अभिवादन करणारी ‘तीन भारतरत्न’ ही सांगीतिक मैफल शनिवारी उत्साहात झाली. मराठवाड्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी निधी उभारण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईजतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गायिका मनीषा निश्चल यांनी ‘ज्योतिकलश झलके’, ‘अपनेही मन से कुछ मांगे’, ‘राम का गुणगान करिये’, ‘मेंदीच्या पानावर’, ‘दिल हुम हुम करे... ’ ही गीते सादर केली. संजीव मेहेंदळे यांनी आरंभी वंदिन अयोध्येचा राजा, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, राम का गुनगान करिये, भेटीलागी जिवा... या रचना ऐकवल्या, तर अमोल निसळ यांनी आता कोठे धावे मन, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, राजस सुकुमार मदनाचा पुतळा.. यांचे सादरीकरण केले. बाजे रे मुरलिया बाजे या रचनेने या रंगतदार मैफलीची सांगता झाली.
गायिका मनीषा निश्चल, गायक अमोल निसळ व संजीव मेहेंदळे यांनी लता मंगेशकरांची गीते, पं. जोशींची अभंगरचना व अटलजींच्या कवितांचे सादरीकरण केले. विवेक परांजपे, यश भंडारे, अमेय ठाकूरदेसाई, अनिल करंजवकर व चेतन परब यांनी साथसंगत केली. अध्यक्ष जीवराज चोले यांनी रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईजतर्फे विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एक लाख ५१ हजारांचा निधी जाहीर केला. यावेळी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय बी. चोरडिया, दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (डिकाई) रघुनाथ येमुल गुरुजी, विद्यार्थी साहाय्यक समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, सचिव तेजस्विनी थिटे उपस्थित होते.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.