पुणे

वाचकप्रेमींसाठी दिवाळी अंकांचा ‘फराळ’

CD

पुणे, ता. २० ः दिवाळीत चकली, चिवडा, लाडू हे फराळाचे पदार्थ पोटाची भूक भागवत असले; तरी मराठीजनांची सांस्कृतिक आणि साहित्यिक भूक भागवली जाते ती दिवाळी अंकांच्या ‘फराळा’नेच. मराठी साहित्याचे वैशिष्ट्य असणारी ही दिवाळी अंकांची परंपरा वर्षागणिक वृद्धिंगत होत असून यंदाही वैविध्यपूर्ण दिवाळी अंक प्रकाशित झाले आहेत.
एकीकडे समाजमाध्यमांमुळे, तंत्रज्ञानामुळे वाचनसंस्कृती कमी होण्याची भीती व्यक्त केली जात असली तरी पुस्तक खरेदी आणि दिवाळी अंकांची खरेदी पाहिल्यावर ही भीती खरी नसल्याचे लक्षात येते. दिवाळी अंकांना तर वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून प्रत्येक वर्षी यात वाढच होत आहे. यावर्षी मराठीत सुमारे चारशे दिवाळी अंक प्रसिद्ध झाल्याचा अंदाज आहे. मात्र यातील बहुतांश अंकांना उत्तम प्रतिसाद आहे. अनेक दिवाळी अंकांचे प्रकाशक दसऱ्यापासूनच किंवा काही प्रकाशक अगदी गणेशोत्सव संपल्यानंतरच अंकाच्या जाहिरातीला सुरुवात करत असल्याचे चित्र गेल्या काही वर्षांपासून दिसते आहे. समाजमाध्यमांवर कल्पक जाहिरातींमधून अंकांची माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जात आहे. उत्तम वाचकवर्ग लाभलेले लेखकही आपापल्या समाजमाध्यमांवरून अंकाची जाहिरात करत असतात. त्यामुळे वाचकांनाही चोखंदळपणे आवडत्या दिवाळी अंकाची निवड करता येत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही या अंकांमध्ये ललित साहित्यविषयक अंकांना सर्वाधिक प्रतिसाद आहे. ‘साप्ताहिक सकाळ’, ‘ऋतुरंग’, ‘पद्मगंधा’, ‘शब्दमल्हार’, ‘मौज’, ‘हंस’, ‘अनुभव’ या अंकांना वाचकांची पसंती आहे. त्याखालोखाल एखाद्या विशिष्ट विषयाला वाहिलेल्या अंकांना मोठी मागणी आहे. महिलांविषयक अंकांमध्ये ‘माहेर’, ‘मेनका’, ‘मिळून साऱ्याजणी’, विनोदी दिवाळी अंकांमध्ये ‘जत्रा’, ‘आवाज’, ‘मोहिनी’ हे दिवाळी अंक लोकप्रिय आहेत.
अर्थविषयाला वाहिलेला एकमेव दिवाळी अंक असलेल्या सकाळ माध्यम समूहाचा ‘सकाळ मनी’ आणि ‘युद्ध नको, बुद्ध हवा’ या संकल्पनेवर आधारित ‘सकाळ अवतरण’ हे दिवाळी अंक वाचकांचे लक्ष वेधून घेत आहेत. गूढ किंवा रहस्य या विषयाला वाहिलेल्या अंकांनाही मोठा वाचकवर्ग लाभत असतो. या प्रकारात ‘धनंजय’चा नारायण धारप विशेषांक, ‘भयकथा’ या दिवाळी अंकांना वाचकांची पसंती आहे. याशिवाय शेती, क्रिकेट, साहसी क्रीडा प्रकार, ज्योतिष, नृत्य-संगीत अशा विविध विषयांना वाहिलेले अंकही बाजारात उपलब्ध आहेत.

ऑनलाइन विक्रीचा फायदा
दिवाळी अंकांची विक्री पूर्वी केवळ वितरकांवर अवलंबून होती. मात्र आता विविध ऑनलाइन व्यासपीठे उपलब्ध झाल्यामुळे प्रत्येक प्रकाशक स्वतंत्रपणे देखील अंकाची विक्री करू शकत आहे. तसेच, वितरण व्यवस्था उत्तम असलेले प्रकाशक हे वाचकांना थेट घरपोच अंक पाठवण्याची सुविधाही उपलब्ध करून देत आहेत. वैयक्तिक वाचनासह भेट देण्यासाठी म्हणून दिवाळी अंक खरेदी करण्याचे प्रमाणही वाढले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : आचारसंहितेच्या धास्तीने निविदा मंजुरीसाठी धडपड; ४०० कोटीच्या कामाचे प्रस्ताव मंजूर

Hockey India League : नवनीत कौर आणि जर्मनप्रीत सिंग करणार एसजी पायपर्सचे नेतृत्व; उपकर्णधारांचीही घोषणा

मोठी बातमी! शाळा बंद आंदोलनातही सुरू होत्या २१६२ शाळा; सोलापूर जिल्ह्यातील १७,८०० शिक्षक शाळा बंद आंदोलनासून राहिले दूर

Mumbai Crime: व्हिसा नसताना भारतात आला, 72 लाखांच्या कोकेनसह पोलिसांनी पकडला

Mephedrone Seized : हडपसरमध्ये मेफेड्रोन विक्री करणाऱ्यास अटक, ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT