पुणे

‘स्थानिक स्वराज्य’ला पहिल्या स्तरावर पहा

CD

पुणे, ता. २७ : ‘‘शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था या नागरिकांशी थेट जोडलेल्या असल्यामुळे त्यांना प्रशासनाच्या पहिल्या स्तरावर पाहिले पाहिजे,’’ असे मत माजी सनदी अधिकारी आणि पुणे इंटरनॅशनल सेंटरचे (पीआयसी) उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर यांनी व्यक्त केले.

‘पीआयसी’तर्फे ‘लोकशाही केंद्रीकरण आणि तिसऱ्या स्तरावरील प्रशासनाचे बळकटीकरण’ या विषयावर वार्षिक परिषदेचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रा. अभय पाथे, केंद्र सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाचे माजी सचिव सुनील कुमार, ट्रान्सफॉर्म रूरल इंडियाचे गव्हर्नन्स प्रमुख जितेंद्र पंडित, तिसरे सरकार अभियानाचे संस्थापक डॉ. चंद्रशेखर प्राण, जनाग्रह संस्थेचे नगर वित्तप्रमुख प्रभात कुमार, ‘ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन’चे डॉ. रामनाथ झा, माजी जागतिक बँक सल्लागार डॉ. रविकांत जोशी, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स ॲण्ड इकॉनॉमिक्सचे माजी कुलगुरू डॉ. अजित रानडे, प्रजा फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हस्के आदी उपस्थित होते.
केळकर म्हणाले, ‘‘पारंपरिकरीत्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे प्रशासनाच्या तिसऱ्या स्तराच्या रूपात पाहिले जाते. परंतु, त्यांना अधिक प्रभावी आणि सक्षम करण्यासाठी धोरणात्मक बदल आवश्यक आहे. स्थानिक समस्यांसाठी समर्पित आणि समावेशक धोरणे तयार करण्याची गरज आहे.’’ तर कुमार यांनी आर्थिक स्वायत्ततेचा अभाव, अंमलबजावणीत अडथळे आणि नागरी सहभागाच्या कमतरतेकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘‘नगरपालिकांनी उत्पन्नवाढीसाठी पर्यायी स्रोतांचा विचार करायला हवा, जसे की मालमत्ता कर सुधारणा आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी मॉडेलचा अवलंब करावा.’’

‘या’ विषयांवर चर्चा...
परिषदेत तज्ज्ञांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज, नागरी सहभागाचे महत्त्व, स्थानिक प्रशासनासमोरील आव्हाने आणि सुधारणा यावर चर्चा केली. परिषदेच्या प्रमुख शिफारशींमध्ये स्वतंत्र मूल्यमापन प्रणालीचा अवलंब, आर्थिक अधिकारांचे विकेंद्रीकरण, स्थानिक प्रशासनाच्या अधिकारात वाढ, आर्थिक संसाधने व सेवा वितरण सुधारण्यावर भर देण्यात आला. परिषदेच्या अखेरीस स्थानिक प्रशासनाच्या आर्थिक अधिकारांत वाढ, नागरी सहभाग अधिक सशक्त करणे, तसेच डिजिटल व्यवस्थापनाद्वारे पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवणे या प्रमुख शिफारशी करण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT