पुणे

उंड्री-पिसोळी रस्त्यावरील दारू दुकानातून रोकड लंपास

CD

पुणे, ता. २१ : कोंढवा परिसरात मागील काही दिवसांत चोरी आणि घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. उंड्री-पिसोळी रस्त्यावरील एअरकिंग वाइन शॉपचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी दीड लाख रुपयांची रोकड आणि बिअरच्या दोन बाटल्या लांबविल्या. ही घटना १९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री घडली.
याबाबत मद्यविक्री दुकानातील कर्मचाऱ्याने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास दुकानाचा दरवाजा उचकटून गल्ल्यातील एक लाख ५७ हजार रुपयांची रोकड आणि बिअरच्या दोन बाटल्या चोरल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरीची माहिती मिळताच कोंढवा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दुकानातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. प्राथमिक तपासात दोन चोरटे घटनास्थळी आले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक अश्विनी पाटील करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TVK MLA Arul Vignesh : सत्ताधारी आमदाराकडून महिला जिल्हाधिकाऱ्याला अश्लील मॅसेज, उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

W,W,W,W! महाराष्ट्राची डबल हॅटट्रिक; भिवंडीच्या विवेक शेलारची भन्नाट गोलंदाजी, टेनिस बॉल क्रिकेटचा नायक, SMATमध्ये चमकला

IFFI 2026: ‘इफ्फी’च्या कोकणी चित्रपट विभागात लघुपटांसह १२ चित्रपटांचा समावेश; गोव्यातील तरुण सर्जनशीलतेचा ‘लघु’अविष्कार

Latest Marathi News Update : 'जो मोठा भाऊ असतो, तोच मुख्यमंत्री होतो' - गृहमंत्री अमित शहा

भाऊ... दादा... साहेब फ्लेक्स काढा! पुणे महापालिकेची अनधिकृत फ्लेक्सवर भन्नाट मोहिम, पुणेकरांनो फोटो काढा अन् 'अशी' करा तक्रार

SCROLL FOR NEXT