पुणे

ताथवडेत साकारणार देशातील पहिले प्रशिक्षण केंद्र

CD

पुणे, ता. १९ : मसुरीच्या लाल बहादूर शास्त्री राष्‍ट्रीय प्रशासन अकादमीच्या धर्तीवर यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीत (यशदा) राज्यातील सर्व विभागांतील वर्ग एकच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने ताथवडे येथील १२० एकर जागा यशदा या संस्थेला दिली आहे. अशा प्रकारचे प्रशिक्षण केंद्र उभारणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरणार आहे.
बाणेर येथील स्वायत्त यशदा संस्था राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून काम करते. राज्यातील इतर प्रशिक्षण संस्थांसाठी गुणवत्ता मानके निश्चित करणे, अभ्यासक्रम तयार करणे, प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करणे आणि मूल्यांकन करणे ही कामे ‘यशदा’मार्फत केली जातात. त्याचबरोबर प्रशासकीय सुधारणा आणि क्षमता वाढविण्यासाठी हे एक महत्त्वाचे केंद्र आहे. ‘यशदा’चा विस्तार हा राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेला अधिक सक्षम बनवण्यासाठी आवश्यक आहे. सध्याची ‘यशदा’ची जागा अपुरी पडत आहे. सध्या त्या-त्या विभागांकडून भरती झालेल्या उमेदवारांसाठी तोच विभागच प्रशिक्षण देतो. आता मात्र ‘यशदा’चा विस्तार होणार असल्याने राज्य सरकारकडील सर्व विभागांमधील नव्याने भरती झालेल्या तसेच तिथे कार्यरत असलेल्या वर्ग एकच्या सर्व अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण ‘यशदा’मध्ये होईल, त्यासाठी स्वतंत्र इमारत उभारण्याचे नियोजन असल्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात जाहीर केले होते. त्यानुसार राज्य सरकारने ही जागा या ‘यशदा’ला देऊ केली आहे, असे ‘यशदा’चे महासंचालक निरंजन सुधांशू यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

‘यशदा’च्या विस्तारानंतर
१) सर्व विभागातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे सोपे जाणार
२) नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळणार
३) राष्ट्रीय स्तरावरील वक्ते, प्रमुख अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळणार
४) सर्वांगीण प्रशिक्षणामुळे अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होणार
५) एखादा विकासप्रकल्प अनेक खात्यांशी संबंधित असतो. असे प्रकल्प वेळेत मार्गी लावण्यासाठी खात्यांमधील समन्वय साधणे सोपे होणार


प्रशिक्षण केंद्रात काय सुविधा?
- प्रशिक्षण वर्ग, वसतिगृहे, ग्रंथालये व सभागृह
- अधिकाऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था
- पर्यावरणपूरक इमारती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोर्टाची मुदत संपली तरी मनोज जरांगे आझाद मैदानात; हायकोर्ट काय घेणार निर्णय? मराठा आरक्षण आंदोलन तापणार

ITR Filing Last Date: आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख काय आहे? ITR न भरल्यास काय होईल?

Latest Marathi News Updates: मराठा समाज आक्रमक; CSMT रोड वर CRP तुकड्या व अश्रूधुराच्या नळकांड्या तैनात

Amazon Great Indian Festival Sale 2025 : मिळणार 80% पर्यंत सूट, 'या' दिवसापासून अमेझॉन सेल डिस्काउंट ऑफर्सचा तडका

Rashid Khan World Record: करामती खानने T20 मध्ये घडवला इतिहास! टॉप-२० मध्ये एकाही भारतीयाला स्थान नसलेल्या यादीत अव्वल

SCROLL FOR NEXT