पुणे

जीवनशैली, आजारांबाबत तरुणपिढी सजग

CD

पुणे, ता. ६ : सध्‍या तरुणांमध्ये जीवनशैली व आजारांविषयी जनजागृतीबरोबरच आरोग्यासंबंधी ऑनलाइन माहिती शोधण्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि लठ्ठपणा यांसारख्या आजारांविषयी डिजिटल माध्यमातून माहिती शोधणाऱ्या नागरिकांची संख्या २०२३ च्‍या तुलनेत २०२४ मध्‍ये देशभरात तब्बल ८४ टक्‍के इतकी वाढली आहे. त्‍यावरून तरुण पिढी जीवनशैली व आजारांबाबत अधिक सजग झाल्याचे दिसते.
याबाबत एका खासगी डिजिटल आरोग्यसेवा देणाऱ्या ॲपने अहवाल तयार केला आहे. त्‍यानुसार मधुमेहाबाबतची माहिती शोधण्‍यात १३ टक्‍के वाढ झाली असून, १८ ते २४ वयोगटातील पुरुषांची व स्त्रियांचीही संख्‍या जास्‍त आहे. तसेच ४५ वर्षांवरील महिलांमध्‍ये उच्च रक्तदाबाविषयी शोध वाढला आहे. त्यामुळे लोकांचा दृष्टिकोन केवळ उपचारकेंद्रित न राहता, प्रतिबंधात्मक आरोग्याकडे झुकलेला दिसून येत आहे. यामध्‍ये शहरी भागातील लोकसंख्या आघाडीवर असल्‍याचे दिसून आले.
भारतात तरुणवर्गाची आरोग्याविषयीची जागृती वाढत आहे. आरोग्यसेवांमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्म, टेलिमेडिसीन, कृत्रिम बुद्धिमत्तासोबत (एआय) आयुष्मान भारत डिजिटल मिशन, ई-संजीवनी या प्लॅटफॉर्मवर ३३ कोटींहून अधिक आभासी वैद्यकीय सल्ले घेतल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. या तंत्रज्ञानामुळे आरोग्यसेवांचा व्यापक विस्तार झाला असल्‍याचे तज्‍ज्ञांचे मत आहे.

हृदयविकारांबाबत वाढतोय शोध
हृदयविकारांबाबत तरुण पिढीतील सजगतेत वाढ दिसून आली आहे. १८-२४ वयोगटातील पुरुषांमध्ये हृदयविकारावरील शोधात १४२ टक्‍के तर महिलांमध्ये १२१ टक्‍के वाढ झाली आहे. तर हृदयविकाराचा सल्ला घेण्‍याचा दर २०२३ मध्ये १.६ होता, २०२४ मध्ये २.५ झाला आहे. त्‍याचप्रमाणे उच्च रक्तदाबावरील सल्ला घेण्‍याचा दर ५.१, मधुमेहासाठी ३.९ इतका आहे.

दर चारपैकी एका भारतीय व्यक्तीला असंसर्गजन्‍य आजारांमुळे मृत्यू होण्याचा धोका आहे. ही आकडेवारी भारतासमोर उभ्या असलेल्या गंभीर आरोग्य संकटावर प्रकाश टाकते. देशात असंसर्गजन्‍य आजारांमुळे ५२ टक्‍के मृत्यू होतात. यातील चारपैकी तीन मृत्यू हे कॅन्सर, मधुमेह, हृदयविकार आणि श्‍वसनविकार या चार प्रमुख कारणांमुळे होतात. या वाढत्या आजारांमध्ये डायबेटीसचे संकट अधिक चिंताजनक आहे, अशी माहिती या खासगी ॲपचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी शशांक एनडी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT