पुणे

पेट्रोल पंपावरील कामगाराची फसवणूक

CD

पुणे, ता. २५ ः मंगळवार पेठेतील एका पंपावर पेट्रोल भरल्यानंतर ऑनलाइन पैसे जमा केल्याची बतावणी करून चोरटे पसार झाले. या प्रकरणी कारचालकासह साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (ता. २३) मध्यरात्री हा प्रकार घडला.
याबाबत पंपावरील कामगार समीर याकूब काझी (वय ३५) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कारचालकासह साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार पेठेत पंचरत्न पेट्रोल पंप आहे. रविवारी मध्यरात्री दोघे जण कारमधून पेट्रोल भरण्यासाठी पंपावर आले होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे काझी यांनी कारमध्ये दोन हजार ४३३ रुपयांचे पेट्रोल भरले. त्यानंतर पेट्रोलचे पैसे ऑनलाइन पद्धतीने पाठविल्याचे काझी यांना सांगितले. काझी यांनी ऑनलाइन व्यवहाराची पडताळणी केली, मात्र पैसे जमा झाले नव्हते. दरम्यान, कारचालक आणि साथीदार पंपावरून पसार झाले. पोलिसांनी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या कारचालकासह साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रणील चौगुले या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

प्रवाशाची एक लाखाची रोकड लंपास
पीएमपी प्रवाशाच्या बॅगेतून चोरट्यांनी एक लाख रुपयाची रोकड चोरून नेल्याची घटना घडली. सोमवारी (ता. २४) रात्री पावणेदहाच्या सुमारास डांगे चौक ते पुणे स्टेशन या मार्गावरील प्रवासात हा प्रकार घडला. याबाबत एका प्रवाशाने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार मूळचे कर्नाटकातील आहेत. तक्रारदार पुणे स्टेशन परिसरात बसमधून उतरले तेव्हा रोकड चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

Team India Cricket Schedule: २० वन डे, २१ ट्वेंटी-२०, १० कसोटी अन् Asian Games; भारताचे पुढील १२ महिन्यांचे क्रिकेट कॅलेंडर

Latest Marathi News Live Update : नंदूरबारमध्ये जखमी अवस्थेत सापडले बिबट्याचे बछडे; वनविभागाकडून उपचार सुरू

Middle East War: पश्चिम आशियातील युद्धामुळे एलपीजीनंतर आता सीएनजीची टंचाई! ऑटो-रिक्षा भाडे वाढले; नवे दर किती?

मुस्लिम हिंदूंपेक्षा चांगला कसा? मुमताज यांच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया; म्हणाल्या- एकीला सोडून दुसरीशी लग्न...

SCROLL FOR NEXT