पुणे, ता. २५ : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये मतदानाच्या दिवशी मतदारयाद्यांमध्ये दुबार वा तिबार नावे असलेल्या मतदारांकडून हमीपत्र घेतले जाणार आहेत. त्याबरोबरच त्यांना एकाच मतदान केंद्रावर मतदान करणे बंधनकारक असणार आहे.
पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकांसाठी सहा लाख ३४ हजार मतदार आहेत. त्यातील १७ हजार ७४४ मतदारांची नावे दुबार किंवा तिबार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा मतदारांकडून मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर हमीपत्र घेतले जाणार आहे. यात संबंधित मतदाराने एकाच ठिकाणी मतदान करणार असल्याचे नमूद करावे लागणार आहे. जर त्यांनी दुसऱ्या मतदान केंद्रावर मतदान केल्याचे आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संबंधित विधानसभा मतदारयादीचा आधार घेतला जातो. नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रांसाठी प्रभागनिहाय मतदारयाद्या तयार केल्या जातात. या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने विशेष सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्यामध्ये मतदारांची नावे समाविष्ट करताना दुबार आणि तिबार नावे आपोआप तपासली जातात व यादीत चिन्हांकित केली जातात. संभाव्य दुबार आणि तिबार मतदारांची नावे आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड केली आहेत. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला या संकेतस्थळासाठी स्वतंत्र आयडी आणि पासवर्ड दिला आहे. त्याद्वारे संबंधित प्रभागातील किती मतदारांची नावे दुबार किंवा तिबार आहेत, हे स्पष्ट झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.