पुणे

ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांचे सोमवारी विद्यापीठात व्याख्यान

CD

पुणे, ता. २५ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागातर्फे आयोजित जनरल बी. सी. जोशी स्मृती व्याख्यानात भारतीय नौदलाचे प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी हे मार्गदर्शन करणार आहेत.
त्रिपाठी हे ‘सागरी शक्ती आणि स्वावलंबनाच्या माध्यमातून भारताचे भविष्य घडवणे-भारतीय नौदलाचा दृष्टिकोन’ विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. हे व्याख्यान सोमवारी (ता. १) विद्यापीठातील स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात दुपारी तीन वाजता होणार आहे. अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी भूषविणार आहेत. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर आणि प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. जनरल बी. सी. जोशी यांचा विद्यापीठाशी विशेष संबंध होता. त्यांनी विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात मुख्य भाषण केले होते. ‘गेटवे ऑफ नॉलेज’ इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात सहभागी होत त्यांनी, ‘भारत २१व्या शतकात जगाचे नेतृत्व करेल’, असा आशावाद व्यक्त केला होता. तसेच विद्यापीठात ‘छत्रपती शिवाजी चेअर फॉर पॉलिसी स्टडीज’ची संकल्पनाही त्यांनी मांडली. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या दूरदर्शी विचारांना श्रद्धांजली म्हणून १९९५ पासून विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिक शास्त्र विभागाने लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या सहकार्याने वार्षिक व्याख्यानमालेस सुरवात करण्यात आली. यापूर्वी ॲडमिरल करमबीर सिंह, जनरल बिपिन रावत, ॲडमिरल अरुण प्रकाश, जनरल के. व्ही. कृष्णराव, जनरल उपेंद्र द्विवेदी यांसारख्या मान्यवरांनी या व्याख्यानमालेत मार्गदर्शन केले आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे प्रमुख आणि अधिष्ठाता डॉ. विजय खरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMart मध्ये खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! हे नियम माहिती नसतील तर नुकसान होऊ शकते, खरेदीपूर्वी नक्की वाचा!

Kolhapur Police Recruitment : कोल्हापुरात पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षा उद्या; ८८ पदांसाठी ११३५ उमेदवार मैदानात

Multibagger Stock: ₹11 चा शेअर थेट ₹1100 वर! 1 लाखाचे झाले तब्बल 1 कोटी 10 लाख; 5 वर्षांत गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ९ वर्षांच्या मुलासमोर घडली धक्कादायक घटना

Kolhapur Water Project : ‘धामणी’चे अतिरिक्त पाणी करवीर तालुक्याला द्यावे; तर, कोल्हापूरला पोलिस आयुक्तालय हवे - नरके

SCROLL FOR NEXT