पुणे

पुण्यात रोखले पंधरा बालविवाह

CD

पुण्यात रोखले पंधरा बालविवाह

पुणे, ता. २६ ः पुण्याच्या ग्रामीण आणि शहरी भागात अजूनही बालविवाहाच्या घटना घडत असल्याचे महिला व बालकल्याण विभागाकडून रोखण्यात आलेल्या बालविवाहांनी पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या नोव्हेंबर महिन्यात १२ बालविवाह रोखण्यात आले तर ऑक्टोबरमध्ये तीन असे होत असलेले १५ बालविवाह वेळीच रोखण्यात आले. यापैकी काहींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या अंतर्गत असलेल्या चाइल्ड हेल्पलाइनच्या आधारे हे बालविवाह रोखण्यात आले आहेत. यापैकी काही प्रकरणामध्ये बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. बालविवाह ही अजूनही समाजातील खोलवर रुजलेली बेकायदेशीर प्रथा आहे. अशा विवाहांमुळे मुलींच्या आरोग्यावर, शिक्षणावर आणि संपूर्ण आयुष्यावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे बालविवाह करणे किंवा प्रोत्साहन देणे हा कायद्याने गंभीर गुन्हा मानला जातो.
यातील सर्वात धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यात घडली. एका घरात नातेसंबंधातील तीन अल्पवयीन मुलींचे विवाह एकाच दिवशी सुरू होते. याबाबत माहिती मिळताच चाइल्ड हेल्पलाइनच्या पथकाने ग्रामसेवक आणि स्थानिक पोलिसांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेत तीनही विवाह थांबवले. तसेच पाषाण आणि बावधन या परिसरातही काही दिवसांपूर्वी बालविवाहाच्या दोन प्रकरणांत कारवाई करून मुलींना सुरक्षित केले असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून देण्यात आली.

चौकट
तुम्ही येथे माहिती कळवू शकता...
नागरिकांना त्यांच्या परिसरात कोणताही बालविवाह घडण्याची शक्यता असल्याची किंवा बालविवाह घडत असल्याची माहिती मिळाल्यास टोल-फ्री क्रमांक १०९८ वर कळवता येईल. स्थानिक अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तसेच पोलिस कर्मचारी यांच्या सहकार्याने चाइल्ड हेल्पलाइनला बालविवाह रोखण्यात यश येत असल्याचे कक्षातील अधिकारी सांगतात.

चौकट
मिळते ठरलेले उत्तर ...
महिला व बालकल्याण विभागाला बालविवाह रोखण्याप्रसंगी एक नेहमीचे उत्तर दिले जाते ते म्हणजे ‘लग्न झाले नाही, फक्त साखरपुडा झाला आहे.’ मात्र, त्याबाबत सर्व माहिती विभागाकडून घेण्यात येते. लग्नासाठीचे विधी झाले असल्यास तत्काळ कारवाई केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बालविवाह रोखले
फेब्रुवारी ते जुलै - १३
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर - १५

कोट
नागरिकांकडून आम्हाला बाल विवाह होत असल्याची माहिती मिळते. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने तो विवाह रोखला जातो. मात्र अशाप्रकारचा विवाह होत असलेल्या मंदिर, मंगल कार्यालयाच्या संबंधितांनी त्याचबरोबर समाजातील सर्वच घटकातील नागरिकांनी माहिती दिली पाहिजे. सर्वांनी पुढे येऊन माहिती दिली तर बालविवाह रोखण्यात आणखी यश येईल. मागील दोन महिन्यातील घटनांपैकी काही जणांवर आम्ही गुन्हे दाखल केले आहेत.
- रोहिणी ढवळे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला, शाहिद आफ्रिदीचा सूर बदलला; आता म्हणतो, भारतच दावेदार होता, संजू सॅमसन....

Latest Marathi News Live Update : सोलापुरात घरगुती गॅस ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करताना तांत्रिक अडचणी

Sambhajinagar Panchayat Samiti : छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती सभापती निवडणुकीपूर्वी गोंधळ; ठाकरेंच्या गटाचे तीन सदस्य गायब

Woman Success Story: राेपवाटिकेच्‍या पश्चिम महाराष्ट्रात १३ शाखांद्वारे राेजगार; शारदा भाेसलेंची नावीन्यपूर्ण यशस्‍वी भरारी, राज्यभर बाेलबाला!

"आमच्यात फक्त मैत्री.." विशालसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर रुचिताचा खुलासा ! म्हणाली..

SCROLL FOR NEXT