पुणे

प्रारूप मतदारयादीवर हरकतींचा पाऊस

CD

पुणे, ता. २६ : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रारूप मतदारयादीवर हरकतींचा अक्षरशः पाऊस पडला आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत तब्बल तीन हजार ३४३ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. या हरकतींची पडताळणी करणे, मतदारयाद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी मुदतवाढ दिल्याने प्रशासनाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. या कामासाठी अतिरिक्त २०० कर्मचारी देण्यात येणार आहेत.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी ३५ लाख ५१ हजार मतदार मतदान करणार आहेत. या मतदारांची ४१ प्रभागांमध्ये विभागणी करून प्रारूप मतदारयादी जाहीर केली आहे. या यादीवर हरकती नोंदविण्यासाठी २७ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र, यादीत प्रचंड चुका असल्याने त्यावर टीका झाली. प्रशासनाने मतदारयादी तयार करायला महिना घेतला आणि नागरिकांना हरकती घेण्यासाठी अवघे आठ दिवस दिले आहेत. इच्छुक उमेदवारांनी महापालिकेकडे हजारो रुपयांचे शुल्क भरून प्रारूप मतदारयादी विकत घेतली. त्या तपासताना प्रत्येक प्रभागात हजारो मतदारांचा घोळ असल्याचे समोर आले. पण त्याची जबाबदारी कोणीही घेत नसल्याने प्रशासनाच्या विरोधात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेऊन निवडणूक आयोगाने महापालिका प्रशासनाला स्वतःहून मतदारयादी तपासणी करून सुधारणा कराव्यात, असे आदेश दिले होते.


यादी तपासणीसाठी मनुष्यबळ
महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी या पार्श्‍वभूमीवर आज १५ क्षेत्रीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त प्रसाद काटकर, रवी पवार आदी उपस्थित होते. दरम्यान मतदारयादी तपासणीचे काम करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्‍यकता असल्याचा मुद्दा या बैठकीत उपस्थित झाला. त्यावेळी यासाठी त्वरित मनुष्यबळ द्यावे, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार २०० ते ३०० अतिरिक्त कर्मचारी या कामासाठी नियुक्त केले जाणार आहेत. सध्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात प्रत्येकी ३० ते ४० कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेले आहेत.

एका दिवसात २६४३ हरकती
प्रारूप मतदारयादीवर हरकती नोंदविण्यासाठी २७ नोव्हेंबरपर्यंत मुदत होती, शेवटचे दोन दिवस शिल्‍लक असल्याने हरकती नोंदविण्यासाठी कार्यकर्त्यांनी आज मोठी यंत्रणा कामाला लावली होती. बुधवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत दोन हजार ६४३ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. यामध्ये सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतून सर्वाधिक एक हजार ६५७ हरकतींची नोंद झाली आहे.

मतदारयाद्यांमध्ये सुधारणा करणे आवश्‍यक आहे. एका प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागात गेली असतील तर तेथे तपासणी करून ही चूक दुरुस्त करावी, या कामाकडे कोणीही दुर्लक्ष करू नये. महापालिका निवडणुकीत विजयी होणाऱ्या उमेदवाराचे मताधिक्य अत्यंत कमी असते. त्यामुळे लक्ष केंद्रित करत मतदारयादी त्रुटीमुक्त कशी होईल, याकडे लक्ष द्यावे.
- नवलकिशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Crime : बारामती तालुका पोलिसांनी प्रेमी युगुलाला लुटणा-या तिघांना काही तासात केले गजाआड....

Mathura Holika Dahan: जळत्या होळीमध्ये चालतो माणूस; मथुरेतील 'या परंपरेमागचं रहस्य काय? ४५ दिवसही करतो अन्नत्याग

ISRO मध्ये वैज्ञानिक असल्याचे सांगत लग्नाचं आमिष; पुण्यातील महिलेकडून ४२ लाख रुपये उकळले...

IND vs ENG, Semi: भारताने इंग्लंडविरुद्ध कोणती Playing XI खेळवावी? रवी शास्त्री, रिकी पाँटिंग यांचा सल्ला; म्हणाले, अभिषेकला तर...

विकी कौशल चिमुकलीच्या चक्क पडला पाया! स्टेजवरचा तो क्षण पाहून सगळेच झाले भावूक, Viral Video

SCROLL FOR NEXT