पुणे, ता. २८ ः महापालिकेतील कनिष्ठ अभियंता(स्थापत्य)पदाच्या रिक्त जागांसाठी होणाऱ्या परीक्षेसाठीचा निकाल आणि गुणवत्ता यादी तत्काळ लावण्यात यावी, अशी मागणी कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन, पुणे संघटनेच्या वतीने महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे करण्यात आली आहे.
पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंतापदाच्या १६९ जागांच्या भरतीसाठी १ डिसेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार होती. त्यासाठी महापालिकेकडे ४२ हजार अर्ज आले आहेत. पुणे शहरातील साडेआठ हजार अर्ज असून छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नागपूर, नाशिक, अमरावती, नांदेड, कोल्हापूर या शहरांमधूनही अर्ज आले आहेत, तर महापालिकेने अपरिहार्य कारण सांगत संबंधित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन पुणे (शासकीय कंत्राटदारांची संघटना) या संघटनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (ता. २७) महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांची भेट घेतली. या वेळी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र भोसले, उपाध्यक्ष भालचंद्र हुलसुरे, सचिव बिपिन दंताळ, तुषार पुस्तके आदी उपस्थित होते.
यापूर्वी झालेल्या परीक्षेचा निकाल आणि गुणवत्ता यादी जाहीर होण्यास अडीच महिन्यांचा कालावधी गेला होता. वास्तविक ऑनलाइन परीक्षा घेतल्यानंतर त्याचा निकाल, गुणवत्ता यादी तत्काळ उपलब्ध व्हायला पाहिजे, प्रत्यक्षात तसे घडत नाही. त्यामुळे महापालिकेने या परीक्षेचा निकाल, गुणवत्ता यादी एमएससीआयटी आणि अन्य ऑनलाइन परीक्षेच्या धर्तीवर तत्काळ उपलब्ध करून द्यावी. संघटनेचे बहुतांश सदस्य सुशिक्षित बेरोजगार अभियंते असून, त्यांच्या दृष्टीने ही परीक्षा महत्त्वाची असल्याचे संघटनेने दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.