पुणे

‘एसआयटी’ला मुदतवाढ मिळणार का?

CD

पुणे, ता. २८ : अपात्र शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे नियमबाह्यरीत्या शालार्थ प्रणालीत समाविष्ट केल्याच्या प्रकारासह अन्य संबंधित गैरप्रकारांच्या चौकशीसाठी शिक्षण विभागाने ऑगस्टमध्ये ‘विशेष चौकशी पथक’ (एसआयटी) नेमले आहे. मात्र, या पथकामार्फत करण्यात येणारी चौकशी अद्यापही सुरू आहे. परिणामी, शालार्थ प्रणालीतील घोटाळ्याची चौकशी करून अहवाल सादरीकरणासाठी ‘एसआयटी’ला आणखी काही काळ लागणार आहे. त्यामुळे या पथकाला चौकशी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची चिन्हे आहेत.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात ‘शालार्थ आयडी’साठी लाच घेताना एका शिक्षण उपनिरीक्षकाला लाचलुचपत विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. या घटनेनंतर आता शिक्षण विभागाने शालार्थ आयडी घोटाळ्यातील चौकशीसाठी ऑगस्टमध्ये नेमलेल्या ‘एसआयटी’च्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील अपात्र शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये नियमबाह्यरीत्या समाविष्ट करून वेतन दिल्यासंदर्भात विविध लोकप्रतिनिधी, संघटना आणि तक्रारदार नागरिक यांच्याकडून सरकारकडे तक्रारी आल्या होत्या. त्या अनुषंगाने नागपूर, नाशिक, जळगाव, बीड, लातूर, मुंबई येथे गैरप्रकार आढळून आल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. या तक्रारींची चौकशी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे ऑगस्टच्या सुरुवातीला ‘विशेष चौकशी पथक’ (एसआयटी) नेमण्यात आले. पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार हे या पथकाचे प्रमुख असून, कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलिस महानिरीक्षक मनोज शर्मा हे सदस्य, तर शिक्षण आयुक्तालयाचे सहसंचालक (प्रशासन, अंदाज व नियोजन) हारून आतार हे पथकाचे सदस्य सचिव आहेत.
राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत अनुदानित आणि अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ मान्यता, सेवा सातत्य, विनाअनुदानितवरून अनुदानित पदांवर केलेली बदली याची तपासणी पथकामार्फत करण्यात येत आहे. याशिवाय शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध मान्यतांच्या संदर्भात प्रचलित व्यवस्थेतील कमतरता शोधून त्याअनुषंगाने बदलाबाबत सुधारणा सुचविण्याची जबाबदारीदेखील या पथकावर सोपविण्यात आली आहे.
पथकाला चौकशीसाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. या तीन महिन्यांच्या आत पथकाने चौकशी अहवाल सादर करणे अपेक्षित होते, परंतु पथकाची अद्याप चौकशी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या पथकाला चौकशी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची चिन्हे आहेत.
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ मान्यता यांसारख्या जवळपास दोनशेहून अधिक तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. या तक्रारीची चौकशी करण्याचे काम पथकामार्फत अद्यापही सुरू असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
...............
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ मान्यता यासंदर्भात जवळपास २०० हून अधिक तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची चौकशी विशेष पथकामार्फत सुरू आहे. या चौकशीसाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ पथकाला देण्यात आले आहे. चौकशीचे काम अद्यापही सुरू आहे. पथकाचा अहवाल सादर झाल्यानंतर त्याचे विश्‍लेषण करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
- सचिंद्र प्रताप सिंह, राज्य शिक्षण आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atrocity Act: मोठी बातमी! अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीत बदल; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, नवा नियम काय?

मध्यप्रदेशच्या तीन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात दिली १० वीची परीक्षा; केंद्र संचालकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT