पुणे

नदीचे सुंदर रूपडे पाहून चेहऱ्यावर समाधान

CD

पुणे, ता. ३० : मुठा नदीच्या पात्रात व्यायामासाठी येणाऱ्यांची गर्दी तुम्ही दररोज पाहत असाल, तशीच गर्दी आजही होती. मात्र आजची गर्दी काठच्या रस्त्यावर व्यायाम करीत नव्हती, तर नदीपात्रात उतरून स्वच्छता करीत होती. एकावेळी हजारो हातांनी अवघ्या तीन तासांत पात्रातून २६३ टन राडारोडा आणि दोन टन कचरा गोळा केला. तेव्हा नदीचे सुंदर रूपडे दिसू लागले अन्‌ सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले.

नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा ‘रिव्हर वीक’ म्हणून, तर २ डिसेंबर हा ‘राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने पुणे महापालिकेच्या घनकचरा व पर्यावरण विभागातर्फे ‘नदी महोत्सव २०२५’ अंतर्गत ‘स्वच्छ नदी, सुंदर पुणे’ उपक्रम राबविण्यात आला. यात युथ फॉर अॅक्शन, इकोसन सर्व्हिसेस फाउंडेशन आणि जीलवोंदी-लिव्हिंग रिव्हर फाउंडेशनसह विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट कंपन्या, बँक कर्मचारी, हेल्थ केअर व उत्पादन कंपन्यांतील कर्मचारी अशा तीन हजार नागरीकांनी सहभाग घेतला. रविवारी सकाळी ७ ते १० या वेळेत भिडे पूल ते म्हात्रे पूल दरम्यान स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
स्वच्छता मोहिमेसोबतच पथनाट्ये, ड्रम सर्कल, सांस्कृतिक कार्यक्रम, नदी संवर्धनाबाबत जनजागृती रॅलीच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृतीचा संदेश देण्यात आला. पर्यावरण जनजागृती स्टॉल्स आणि प्रदर्शनाला नागरीकांनी गर्दी केली होती. सहभागी नागरीकांना रोपांचे मोफत वाटप करण्यात आले.
‘‘शहर स्वच्छ ठेवण्यास महापालिका सदैव तत्पर आहेच. पण पुणे शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे,’’ असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले. याप्रसंगी सचिन सगरे, पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर, पृथ्वीराज बी. पी., ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, घनकचरा विभागाचे उपायुक्त अविनाश सकपाळ, पर्यावरण विभागाच्या उपायुक्त किशोरी शिंदे उपस्थित होते.

PNE25V72195
PPRTT25B16786

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे जागतिक शेअर बाजारात भूकंप, 'या' कंपन्यांचे शेअर्स गडगडले

Manoj Jarange Patil: सातारा गॅझेट लागू न झाल्यास पुन्हा आंदोलन: मनोज जरांगे पाटील, सात तारखेपर्यंत सकारात्मक निर्णय अपेक्षित!

Sahyadri tiger reserve update : ‘सह्याद्री प्रकल्प’मध्ये ‘शिलेदार’ची एन्ट्री, ‘तारा’सोबत जमणार का जोडी? निसर्गप्रेमींसाठी उत्सुकता

Israel-Iran war: इस्त्राईल–इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात पेट्रोल-डिझेल संपणार; अफवांमुळे पंपांवर वाहनधारकांच्या रांगा

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरण : नाशिकमधील डॉ. अमोल पाटीलला पोलिसांनी चौकशीसाठी घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT