पुणे

शेवगा लागवड, उत्पादन व निर्यात संधी

CD

पुणे, ता. ३० : स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात नियमित मागणी असणाऱ्या शेवग्याचा आयुर्वेद औषधींमध्येही वापर वाढला आहे. शेवगा पिकाच्या आधुनिक लागवड पद्धती, पीक व्यवस्थापन व निर्यात व्यवस्थापनाबाबत माहिती करून देणारी कार्यशाळा ७ डिसेंबरला आयोजिली आहे. कार्यशाळेत निर्यातक्षम शेवगा उत्पादन पद्धती, आधुनिक जाती, खत व पाणी व्यवस्थापन, छाटणी, फुलोरा अवस्था, काढणी व्यवस्थापन, निर्यातीच्या संधी, निकष, ट्रेसिबिलीटी, शेवगा निर्यातीसाठी गुणवत्तेची पडताळणी, परकीय बाजारपेठ, निर्यातीसाठी शेंगांचा देठ किती व कसा ठेवावा, रसायनमुक्त उत्पादन, कागदपत्रांची पूर्तता, देशनिहाय निर्यातीचे नियम इ. संदर्भात नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७

सरकारी बाजारपेठ प्रशिक्षण
सरकारी संस्था/विभाग/सार्वजनिक संस्था खरेदी करत आलेल्या विविध वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी एक ई-बाजारपेठ म्हणजेच डिजिटल ई-कॉमर्स पोर्टल आहे, ते म्हणजेच जीईएम पोर्टल. या पोर्टलवर सरकारी संस्था/विभाग/सार्वजनिक संस्थांना लागणाऱ्या वस्तू, एखादा इच्छुक व्यक्ती त्याच्या व्यवसायाची नोंदणी करून त्याच्या सेवा व वस्तूंची थेट विक्री करू शकतो. हे प्लॅटफॉर्म केंद्र व राज्य सरकारातील मंत्रालये/विभाग, केंद्र व राज्याचे सार्वजनिक उपक्रम, स्वायत्त संस्था आणि स्थानिक संस्थांना सामान्य वापराच्या वस्तू आणि सेवा पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने खरेदी करण्यासाठी आरंभापासून अखेरपर्यंत ऑनलाइन मार्केटप्लेस उपलब्ध करून देते. याबाबतच मार्गदर्शन करणारे ऑनलाइन दोन आठवडे चालणारे प्रशिक्षण ८ डिसेंबरपासून आयोजिले आहे. व्यवसाय वाढीसाठी हे उपयुक्त प्रशिक्षण आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२

शेतकरी कंपनी नोंदणी सेवा
केंद्र तसेच राज्य सरकारद्वारे शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतमालाचे मूल्यवर्धन व मार्केटिंग करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. ‘एसआयआयएलसी’तर्फे राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी विविध प्रकारच्या सेवा, मार्गदर्शन एक-खिडकी पद्धतीने उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. यापैकी एक सेवा म्हणजे शेतकरी कंपनीची नोंदणी सेवा. कंपनीची नोंदणी योग्य प्रकारे केली गेली, कंपनीचे नियम-पोटनियम हे सर्वसमावेशक, व्यापक व परिपूर्ण अभ्यासाने बनवले गेले तर नोंदणीनंतरच्या सुरूवातीच्या काळातील व्यवसाय तसेच भांडवल उभारणीतील मर्यादा-अडचणी टाळणे शक्य होते, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याची पात्रताही तयार होत राहते. या पार्श्वभूमीवर सिमासेस लर्निंगने अनुभवी सीए, सीएस, कृषी व्यवसाय मार्गदर्शकांच्या माध्यमातून शेतकरी कंपनीची नोंदणी सेवा उपलब्ध केली आहे.
संपर्क : ८९५६७१२६३१


पुणे- पिंपरी-चिंचवड आवृत्त्यांसाठी
जीएसटी अकाउंट असिस्टंट,
ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन प्रशिक्षण
डॉ. नानासाहेब परुळेकर (सकाळ) चॅरिटेबल ट्रस्ट आणि टेक महिंद्रा फाउंडेशनच्या वतीने १८ ते ३५ वयोगटांतील तरुण-तरुणींसाठीचे विनामूल्य प्रशिक्षण वर्ग १ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. या रोजगाराभिमुख प्रशिक्षण वर्गांमध्ये वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘जीएसटी अकाउंट असिस्टंट’ आणि कला किंवा इतर शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन’ हे कोर्सेस घेतले जातात. याबरोबरच विद्यार्थ्यांना संगणक, इंग्रजी संभाषण आणि व्यक्तिमत्त्व विकास इत्यादी नोकरीच्या ठिकाणी गरजेची असणारी महत्त्वाची कौशल्ये विनामूल्य शिकविली जाणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच नोकरी मिळवून देण्यासाठी खात्रीशीर साहाय्य पुरवले जाते. इच्छुक विद्यार्थ्यांनी पुढे दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधावा किंवा दिलेल्या पत्यावर भेट द्यावी.
संपर्क : ८५५४०६९७९७/ ८६६८७६२२४० / ८७६७६९६२८८
ठिकाण : चाळ नंबर ८८/४, डांबर कोठी, नगरसेवक गौडा यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर, पर्वतीदर्शन, स्वारगेट, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! आठव्या वेतन आयोगानुसार किमान 'इतका' असेल पगार, आकडा आला समोर

IND vs NZ 3rd T20I : भारताने जिंकली सलग नववी ट्वेंटी-२० मालिका! अभिषेक, सूर्यकुमारच्या वादळासमोर न्यूझीलंडचा पालापाचोळा

Accident News: भीषण अपघात! महामार्गावर दोन बसची समोरासमोर टक्कर; तिघांचा मृत्यू, अनेक जखमी

Indian Video : भारताला स्वातंत्र्य 99 वर्षांच्या करारावर मिळालंय? 2046 मध्ये इंग्रज परत येणार? वादग्रस्त व्हिडिओतील वक्तव्य कितपत खरं

Latest Marathi news Update : देश-विदेशातील दिवसभरातील घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT